सह्याद्री, गडकिल्ले आणि निसर्गाची मुक्त उधळणं म्हटल की पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकण पट्ट्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शत्रूला अस्मान दाखवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये छोट्या मोठ्या अनेक गडकिल्ल्यांची निर्मिती केली. आजही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देणारे हे गड थाट मानेने उभे आहेत. याच स्वराज्याच्या ठेव्यातील एका गडाची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक महत्त्व असणारा दुर्ग म्हणजे Rangana Fort. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गडांच्या निर्मितीचे श्रेय शिलाहार राजा भोज (दुसरा) याला दिले जाते. त्याने त्याच्या कार्यकाळात कोल्हापूरमध्ये सत्तेत असताना जवळपास 15 गडांची निर्मिती केली. या पंधरा गडांमध्ये रांगड्या रांगणा गडाचा सुद्धा समावेश आहे. रांगणा गड इतिहासामध्ये ‘प्रसिद्ध गड’ या नावाने प्रचलित आहे. इतिहासात केलेल्या उल्लेखानुसार बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा गड राजाने बांधून घेतला. विक्रमादित्य राजा भोज याने केलेल्या गडनिर्मितीच्या कार्यामुळे त्याला ‘दुर्गनिर्मिती करणारा महान अधिपती’ आणि ‘पर्वतांना अंकित करणारा शूर सत्ताधीश’ अशा उपाधीने संबोधले जाते. अशा या रांगणा किंवा प्रसिद्धगडाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
रांगणा गडाचा इतिहास
रांगणा गडाच्या इतिहासा बद्दल इतिहास कारांची विविध मत आहेत. तुम्ही वरती वाचलं असेल की, रांगणा गडाची निर्मिती शिलाहार राजा भोज याने केली. मात्र, यावरून इतिहास कारांमध्ये एकमत नाही. काही इतिहास कारांचे असे मत आहे की हा गड शिलाहार राजाने बांधला. यासाठी पुरावा म्हणून ग्रँट डफ याच्या सातारा ताम्रपटाचा आधार घेतला जातो. राजा भोजने आपली राजधानी इ.स. 1187 साली वाळव्याहून कोल्हापूरला आणून पन्हाळगडावर राजधानी स्थापन केली. त्यानंतर त्याने कोल्हापूराच 15 च्या आसपास गडांची बांधणी करून घेतली. त्यामध्ये रांगणा गडाचा सुद्धा समावेश होता. असे इतिहास कारांचे मत आहे. मात्र हा गड राजा भोजनेच बांधला याचा सबळ पुरावा उपलब्ध नाही.
गडावरील बांधकामावर आदिलशाहीचा ठसा उमटल्याचा भास होतो. इ.स 1307 ते इ.स 1658 या काळात या गडावर मुघलांनी आणि आदिलशाहीने आपली सत्ता गाजवली. दरम्यान, महम्मद गावाने इ.स 1470 मध्ये हा गड जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले. मात्र, हा गड त्याच्या सहज हाती लागला नाही. त्यासाठी त्याचे बरेच सैन्य कामी आले खर्चही बक्कळ झाला. त्यामुळे तो म्हणाला की, अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, पण त्यात मर्दुमकीबरोबरचं संपत्तीही खर्च करावी लागली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजेत सतराव्या शतकात रांगणा आदिलशाही सरदार सावंत यांच्या ताब्यात होता. मात्र, 1666 साली रांगणा गड स्वराज्यात दाखल झाला. त्यामुळे आदिलशाहीच्या गोठ्यात खळबळ उडाली होती. 1667 साली रांगणा जिंकून घेण्यासाठी आदिलशाही सरदार बहलोलखान आणि व्यंकोजी राजे यांनी गडावा चहूबाजूंनी वेढा घातला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: सैन्याचे नेतृत्व करत आदिलशाहीचे आक्रमण मोडून काढले. त्यानंतर आदिलशाहीला किंवा मुघलांना रांगणा गड कधीच जिंकता आला नाही.
फितुरी झाली अन् धाकलं धनी (छत्रपती संभाजी महाराज) गनीमांच्या तावडीत सापडले. मुकर्रबखानाने त्यांना पकडल्यानंतर औरंगबजेबाने त्यांचा अत्यंत क्रूरपणे वध केला. एकीकडे स्वराज्य संकटात सापडलं होतं. तर दुसरीकडे सूर्याजी पिसाळने फितूरी करत औरंगजेबाचे पाय धरले आणि रायगडाला वेढा घालत राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद केले. या काळात राजाराम महाराज रांगणा गडाच्या मार्गेच जिंजीले गेले होते. इ.स 1700 साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाल. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची सर्व सूत्र महाराणी ताराबाईंच्या हाती आली. विशेष बाब म्हणजे ताराराणींच्या सैनात संताजी घोरफडे आणि धनाजी जाधव यांसारखे मातब्बर योद्धे होते. संताजी आणि धनाजी आले असं म्हणताच औरंगजेब सुद्धा घाबरत होता.
याच दरम्यान औरंगजेबाने नवा डाव टाकत ताराराणी आणि शाहू यांच्यामध्ये संघर्ष सुरू करण्याच्या हेतून राणी येसूबाई आणि पुत्र शाहू महाराज यांची सुटका केली. 13 एप्रिल 1731 रोजी ताराराणी आणि शाहू महाराज यांच्यात वारणा येथे तह झाला. या तहानुसार वारणेच्या दक्षिणेकडील भाग ताराराणींच्या ताब्यात गेला. या दक्षिणेकडील भागात रांगणा गडाचा सुद्धा समावेश होता. शाहू महाराजांनी जेव्हा ताराराणींवर आक्रमण केले होते. तेव्हा पन्हाळा सोडून तारारणींना रांगणा गडाचा आश्रय घेतला होता.
शाहू महाराजांनी रांगणा गडावर सुद्धा हल्ला केला होता. गड वाचवण्यासाठी पिराजी घोरपडे आणि रामचंद्रपंत अमात्य यांनी निकराचा लढा दिला होता. मात्र, ताराराणी त्यांच्या हाती लागल्या नाही. त्यांनी तेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा आश्रय घेतला होता. मात्र, शाहू महाराजांना रांगणा गड काही जिंकता आला नाही. त्यानंतर सावंतवाडीच्या भोसल्यांनी सुद्धा अनेक वेळा रांगणा गड जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना सुद्धा गड जिंकता आला नाही.
अखेर 1767 साली रांगणा गड जिंकून घेण्यास सावंतवाडीच्या भोसल्यांना यश आले. त्यानंतर काही काळ गड जिवाजी विश्रामकडे होता. इंग्रजांनी 1818 साली स्वराज्यातील अनेक गड आपल्या ताब्यात घेतले होते. त्याच काळात रांगणा, भुदरगड, सामानगड आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी रांगणा गड तोफा डागून उद्ध्वस्त केला होता.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
रांगणा गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. गडावर गेल्यानंतर लक्ष वेधून घेतो तो निंबाळकरांचा वाडा. हा वाडा कोणी बांधला याची इतिहासात नोंद आढळून येत नाही. वाड्याची संपूर्ण पडझड झालेली आहे. वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे वाड्यातच एक विहिर आहे. मात्र, विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. याव्यतिरिक्त गडावर गणेशाचे मंदिर आहे. मंदिर पूर्ण दगडात बांधण्यात आलेले आहे. हे पाहून झाल्यानंतर गडावर रांगणा देवीच मंदिर आहे. त्याच बरोबर मंदिरा समोर दीपमाळ सुद्धा आहे. मंदिर चांगल्या स्थितीत असून कौलारू स्वरुपाचे आहे. त्यामुळे या मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
रांगणा गडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गडावरून कोकणात जाण्याची एक वाट आहे. गडावरील दरावाजावर एक गोल बुरूज लक्ष वेधून घेतो. या बुरूजातून एक दरवाजातून कोकणात जाण्याची वाट आहे. त्यामुळे या दरवाजाला ‘कोकण दरावाजा’ असे संबोधले जाते.
गडावर जायचे कसे
रांगणा गडावर जाण्याच्या दोन वाटा आहेत. एक वाट कोल्हापूरातून आणि दुसरी वाट कोकणातील कुडळजवळ असणाऱ्या नारुर आणि केखडे या गावातून गडावर गेली आहे.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का
गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे आपली सोय आपणच करावी. तसेच गडावर रांगणा देवीचे मंदिर आहे. त्यामुळे मंदिरात काही जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते. त्याच बरोबर गडावर काही पाण्याची टाकी आहेत. परंतु पाणी पिण्यायोग्य आहे का नाही याबाबत खात्री नाही. त्यामुळे गडावर जाताना मुबलक प्रमाणात पाणी घेऊन जावे.
ह ही लक्षात ठेवा
आपले गड आपल्या मंदिरासमान आहेत. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखा, गडावार कोणताही कचरा करू नका किंवा करून देऊ नका.
जश शिवराय