Reliance Foundation Scholarship – 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, जाणून घ्या पात्रता आणि फायदे

रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation Scholarship) माध्यमातून 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Reliance Foundation Undergraduate Scholarships 2025-26चा पर्याय खुला झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता, फायदे आणि कागदपत्रे कोणती लागणार याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Reliance Foundation Undergraduate Scholarships 2025-26 पात्रता

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी
  • अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा नागरिक असावा
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असावा (शैक्षणिक वर्ष 2025-26)
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असावे (ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल)
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला कंपल्सरी Aptitude Test द्यावी लागणार आहे.

अपात्रता काय आहेत?

  • पदवीच्या दूसऱ्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अपात्र असतील.
  • ज्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाला ऑनलाईन, हायब्रिड, रिमोट, डिस्टन्स किंवा इतर कोणत्याही पद्धतीने प्रवेश घेतला असेल, तर ते विद्यार्थी अपात्र असतील.
  • दहावी नंतर डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी अपात्र असतील.
  • ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष आणि 6 वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल, असे विद्यार्थी अपात्र असतील.
  • Aptitude Test दरम्यान जे विद्यार्थी कॉपी करताना आढळतील किंवा ज्यांनी ही परीक्षा दिली नाही, असे विद्यार्थी अपात्र असतील.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत?

  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा कायमच्या पत्त्याचा पुरावा
  • दहावी आणि बारावी परीक्षेची मार्कशीट
  • पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
  • ग्रामपंयात/सरपंच/वॉर्ड काउन्सिलर यांनी दिलेला कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला. किंवा SDM/DM/CO/तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
  • जर अर्ज करणारा विद्यार्थी अपंग असेल तर, संबंधित सराकरी अधिकाऱ्यांनी जारी केलेले अधिकृत अपंगत्व प्रमाणपत्र
  • अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन आणि बँकेचा तपशील सुद्धा सादर करावा लागेल.

सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर फायदा काय होणार?

जे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र होतील, अशा विद्यार्थ्यांना पदवी कार्यक्रमाच्या कालावधीत 2 लाख रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल.

अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – Reliance Foundation Undergraduate Scholarships 2025-26

(या शिष्यवृत्तीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जात नाही)

“ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. अधिकृत तपशील व अर्जासाठी कृपया संबंधित संकेतस्थळाला भेट द्या.”