Resorts in Wai; आयुष्यातले काही क्षण घालवा सह्याद्रीच्या कुशीत

निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडत नाही. मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत सह्याद्रीच्या कुशीत आयुष्यातले काही क्षण घालवायचे असतील तर, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील या रिसॉर्ट्सला (Resorts in Wai) एकदा नक्की भेट द्या. वाई शहरामध्ये प्रवेश केल्यावर तुमच्या गाडीमध्ये CNG, Petrol किंवा Diesel फूल करूनच पुढे प्रवासाला सुरुवात करा. ढोल्या गणपतीच दर्शन घेतल्यानंतर निसर्गाच्या कुशीत तुमता प्रवास सुरू होईल.

1 ) Mystic Stays

जोर गावच्या वेशीवर हे रिसॉर्ट असून कृष्णामाईच सुंदर रूप आणि महाबळेश्वरचा डोंगर या रिसॉर्ट मधून तुम्ही पाहू शकता. पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही या ठिकाणी येवून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटू शकता. जोर गावात जन्नीदेवीच्या मंदिर आवारातून घनदाट जंगलातून थोड पुढे गेल्यावर नदीच सुंदर रूप तुम्हाला अनुभवता येईल. वाईतून वयगांव मार्गे बलकवडी धरणाला वळसा मारून निसर्गाच सुंदर रूप डोळ्यात साठवत तुम्ही या रिसॉर्टवर पोहचू शकता. जर तुम्ही मुंबई वरुण येणार असाल तर 264km, पुणे वरुण येणार असाल तर 121km आणि वाईतून 33km अंतर तुम्हाला पार कराव लागेल. या रिसॉर्टच बूकिंग ऑनलाइन करू शकता त्यासाठी पुढील लिंक ओपन केल्यावर अधिक माहिती तुम्हाला मिळून जाईल. Mysitc Stays

2 ) The Vally Village Resort

बलकवडी धरणाचा सुंदर नजारा या रिसॉर्टच्या आवारात बसून तुम्ही पाहू शकता. अगदी धरणाच्या समोरच हे रिसॉर्ट असल्यामुळे डोळ्याच पारण फिटल्याशीवाय राहत नाही. रिसॉर्टच्या समोरच केट्सपॉइंट आणि डाव्या बाजूला कमळगड किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही मुंबई वरुण येणार असाल तर 257km, पुणे 113km आणि वाई वरुण 25km अंतर पार करून तुम्ही हिते पोहचाल. वाई वरुण वयगांव मार्गे आल्यावर अगदी बलकवडी धरणाच्या समोरच उळुंब गावाच्या हद्दीत हे रिसॉर्ट आहे. बूकिंग कशी कराल तर त्यासाठी लिंक The Vally Village Resort ही लिंक ओपन केल्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल.

3 ) I camp Resort

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये हे रिसॉर्ट असून समोरच कृष्णा नदी आणि बलकवडी धरणाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. महाबळेश्वर केट्सपॉइंटच्या अगदी पायथ्यालाच हे रिसॉर्ट आहे. तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही जवळच असणाऱ्या वयगांव गावातून चालत एक ते दिड तासात महाबळेश्वरला जावू शकता. या रिसॉर्टच्या समोरच कामळगड पाहायला मिळतो परतवडी किंवा नांदगने या गावांमधून तुम्ही कमळगडला सुद्धा जावू शकता. या रिसॉर्टवर पोहोचण्यासाठी मुंबई मधून 256km, पुणे मधून 115km आणि वाई मधून 25km च अंतर पार कराव लागेल. ऑनलाइन बूकिंग साठी लिंक I camp Resort ही लिंक ओपेन केल्यावर तुम्हाला हवी ती माहिती मिळून जाईल.

4 ) Redstone Resort Wai

निसर्गाच्या हिरव्या शालूवर पसरलेल हे रिसॉर्ट म्हणजे एक वेगळी अनुभूतीच. बोरगांव गावच्या जवळ असणार हे रिसॉर्ट पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरल आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी बोरगांव गावातून चालत तुम्ही पाचगणीला जावू शकता. तुम्ही जर मुंबई वरुण येणार असाल तर 250km, पुणे वरुण येणार असाल तर 109km आणि वाई मधून 19km च्या अंतरावर हे रिसॉर्ट वसल आहे. बोरगाव आणि दहयाट या दोन गावांच्या दरम्यान हे रिसॉर्ट असून सुट्टीचा मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकता. ऑनलाइन बूकिंग उपलब्ध असून त्याची लिंक Redstone Resort Wai ही लिंक ओपन करून तुम्ही हवी ती माहिती मिळवू शकता.

5 ) Magnus Caverns Resort (Dhom Dam Wai Resorts)

समोरच कृष्णामाईच शांत पात्र आणि धोम धरणाच्या शेजारीच हे रिसॉर्ट आहे. त्याचबरोबर रूम्सची रचना सुद्धा आकर्षक असल्यामुळे पाहताच या रिसॉर्टच्या तुम्ही प्रेमात पडाल. या रिसॉर्ट पासून जवळच व्याहळी गावातून धोम धरणाच्या रस्त्याने थोडं पुढे धरणाच्या बाजूलाच पुरातन बांधकाम शैलीच नरसिंहाच मंदिर आहे. या रिसॉर्टला जाण्याचा योग आला तर या मंदिराला नक्की भेट द्या. त्याचबरोबर बोरीव मध्ये बोटिंग, हॉर्स रायडींग सारख्या सुविधांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तुम्ही जर मुंबई मधून येणार असाल तर 240km, पुणे मधून 97km आणि वाई मधून 8km वर हे रिसॉर्ट आहे. धोम धरणाच्या अगदी जवळच हे रिसॉर्ट असल्यामुळे मुख्य रस्त्यावरूनच या रिसॉर्टच दर्शन होत. ऑनलाइन बूकिंग उपलब्ध असून त्याची लिंक Magnus Caverns Resort

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील ही काही रिसॉर्टस् आहेत. सर्व रिसॉर्टची लिंक उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे रिसॉर्टची सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल. कधी वाईमध्ये येण्याचा योग आला तर यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्या कोणत्याही रिसॉर्टला नक्की भेट द्या. या सर्व रिसॉर्ट पासून काही अंतरावरच कमळगड किल्ला आहे. सह्याद्रीचा फ्रीज म्हणून कमळगड किल्ला ओळखला जातो. त्यामुळे कमळगड किल्ल्याला नक्की भेट द्या. तसेच वाई पासून मेणवली घाट आणि मेणवली पासून पुढे गेल्यावर रायरेश्वर किल्ल्यावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. रायरेश्वर पठार पावसाळ्यात असंख्य फुलांनी बहरलेलं पाहायला मिळतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

4 thoughts on “Resorts in Wai; आयुष्यातले काही क्षण घालवा सह्याद्रीच्या कुशीत”

Leave a comment