Sakib Hussain Biography – जिया हो बिहार के लाला! राजस्थानची पळता भुई थोडी करणारा 21 वर्षांचा साकिब हुसैन आहे तरी कोण?

IPL चा रणसंग्रामा म्हणजे जुन्या दिग्गज खेळाडूंसह नवीन ताऱ्यांच्या उगमाचा महोत्सव. दरवर्षी नवे तारे स्पर्धेमध्ये चमकदार कागमगिरी करून जागतिक क्रिकेटच लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. असाच एक तरुण तडफदार खेळाडू म्हणजे 21 वर्षीय साबिब हुसैन (Sakib Hussain Biography). सोमवारचा (13 एप्रिल 2026) दिवस त्याच्यासाठी स्वप्नवत ठरला. आयपीएलमध्ये हैदराबादकडून त्याने पदार्पण केलं आणि पहिल्या सामन्यात राजस्थान सारख्या तुफान फॉर्मात असणाऱ्या संघाला घायाळ केलं. बिहारच्या या पोरानं राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांच्या दांड्या गुल गेल्या.

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांना एका हाय-स्कोअरिंग सामन्याची अपेक्षा होती. मात्र, साकिब हुसैन आणि त्याच्यासोबत पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगे या दोन युवा वेगवान गोलंदाजांनी ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरवली. साकिबने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत केवळ 24 धावा दिल्या आणि 4 महत्त्वाचे बळी टिपले. या धारदार गोलंदाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मोठा विजय मिळवला.

बिहारच्या मातीतून आलेला हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गेल्या काही काळापासून आयपीएल स्काउट्सच्या नजरेत होता. साकिबला आयपीएल 2026 च्या लिलावात हैदराबादने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात होता, परंतु त्याला तिथे मैदानात उतरण्याची संधी मिळाली नव्हती. साकिबने घरगुती क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली असून 2025-26 च्या रणजी ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध 41 धावांत 6 बळी घेण्याचा पराक्रम त्याने केला होता. याच अनुभवाचा फायदा त्याने आयपीएलच्या मोठ्या मंचावर करून घेतला.

साकिब हुसैन आता आयपीएल इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत तो आता संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत अल्झारी जोसेफ (6/12) अव्वल स्थानी असून, त्यापाठोपाठ अँड्र्यू टाय (5/17) आणि शोएब अख्तर (4/11) यांचा क्रमांक लागतो. साकिबने आता अश्वनी कुमारच्या 24 धावांत 4 बळी या कामगिरीशी बरोबरी केली असून, त्याने केवॉन कूपर, डेव्हिड विसे आणि स्वतःचा सहकारी प्रफुल्ल हिंगे यांनाही मागे टाकले आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!