Wai News – अन् कष्टाचं फळ मिळालं; संजय मालुसरे यांची शरीरसौष्ठव जिल्हा पंचपदी नियुक्ती

सातारा जिल्ह्यातील मानाची ‘स्पोर्टिका श्री’ स्पर्धा नुकतीच बाजार समिती हॉल वाई (Wai News ) येथे पार पडली. स्पोर्टिका फिटनेस क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून अनेक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला आणि शरीरप्रदर्शन करत आपल्या कलेची झलक उपस्थितांना दाखवली. यावेळी सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व वाई तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्याकडून संजय चंद्रकांत मालुसरे यांची जिल्हा पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली.

संघटनेसाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने योगदान देणाऱ्या संजय चंद्रकांत मालुसरे यांच्या कार्याची दखल घेत सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व वाई तालुका शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने त्यांची सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या जिल्हा पंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील शरीरसौष्ठव खेळाच्या विकासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!