Satara Crime खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये अत्यंत भयानक घटना घडली असून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणाचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं त्याला विविध ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या तोंडावर लघुशंका सुद्धा केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना 19 जुलै 2025 रोजी घडली आहे. सोमनाथ शंकर राऊत (25) असे पीडित तरुणाचे नाव आहे. 19 जुलै रोजी दीड वाजता सोमनाथचे राहत्या घरातून संशयित आठ जणांनी अपहरण केलं. त्याला गाडीमध्ये बसवून विविध ठिकाणी नेलं. त्याला सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली. लाथा बुक्क्या आणि पट्ट्याने त्याला मारण्यात आलं. कहर म्हणजे एकाने त्याच्या तोंडावर लघुशंका केली. त्यानंतर शिवथर येथे नेऊन पुन्हा त्याला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता त्याला शिरवळ येथे सोडण्यात आलं आणि ते सर्वजण पसार झाले. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी अनिल उर्फ पाप्या श्यामराव वाडेकर (30) आणि वैभव नवथरे (32) यांना अटक केली असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.