Satara News – पर्यावरणपूरक गणेशोत्सव; वयगांवकरांच्या एकीचा विजय, वाई तालुक्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी, आज सत्कार होणार

वयगांव गावाने ‘पर्यावरणपूरक Ganeshotsav 2025’ या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत वाई तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आज (11 सप्टेंबर 2025) वयगांव गावासह सातारा (Satara News) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या गावांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 12 गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाई तालुक्यातून वयगांव हे एकमात्र गाव या पुरस्कारासाठी पात्र ठरलं आहे. तसेच सातारा तालुक्यातून वर्ये, कोरेगाव तालुक्यातून काळोशी, खटाव तालुक्यातून पुसेगाव आणि सातेवाडी, माण तालुक्यातून मलवडी, फलटण तालुक्यातून सुरवडी, जावली तालुक्यातून रायगाव, खंडळा तालुक्यातून विंग, महाबळेश्वर तालुक्यातून गुरेघर, कराड तालुक्यातून रेठरे बु. आणि पाटण तालुक्यातून ढोरोशी या गावांचा समावेश आहे.

Wai News – वयगांवने पटकावला माझी वसुंधरा अभियान – E pledge मध्ये राज्यात प्रथम क्रमांक; बलकवडी, दह्याट आणि गोळेगाव अव्वल दहामध्ये