Satara News – कराड तालुक्याचे पहिले मंत्री श्याम आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

Satara News माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (08 ऑक्टोबर 2025) दुपारी पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली. कराड तालुक्याच्या विकासात श्याम आष्टेकर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या रुपात कराड तालुक्याला पहिलं मंत्रीपद मिळालं. त्यामुळे कराड तालुक्याच्या क्रीडा, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे श्याम आष्टेकर यांच्या निधनामुळे कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा होता श्याम आष्टेकर यांचा जीवनप्रवास?

  • श्याम आष्टेकर यांचा जन्म कराड येथे 2 ऑगस्ट 1934 साली झाला.
  • तरुण वयातच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग.
  • कराड नगरपालिकेचे 10 वर्ष उपनगराध्यक्ष
  • 1985 साली पहिल्यांदाच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदार.
  • सलग दोन कार्यकाळ त्यांनी आमदारकी भूषवली
  • क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागांचे नऊ वर्ष मंत्रिपद
  • तळबीड MIDS उभारण्यात मोलाचा वाटा.