Satara News कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र झाला आहे. सलग सात दिवस झाले खडी क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आंदोलन सुरू आहे. मंत्रालयायाच्या दिशेने निघालेला हा लँग मार्च आता पुण्यातील वाकडपर्यंत पोहोचला आहे. आणखी 142 किलीमीटरचा टप्पा ग्रामस्थांना पार करत मुंबई गाठायची आहे. याच दरम्यान आंदोलनकर्त्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारा सन्मान निधी नाकारला आहे.
खडी क्रशर बंद करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी गेले सात दिवस सर्व ग्रामस्थांच आंदोलन सुरू आहे. यासाठी सोमवारी (21 जुलै 2025) मोर्चाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची पुण्यामध्ये भेट सुद्धा घेतली. यावेळी आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडण्यात आली, तसेच कागदोपत्री पुरावे सुद्धा देण्यात आले. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. उलट तुम्ही सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या, अशा सुचना आयुक्तांनी ग्रामस्थांना दिल्या. त्यामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले होते. तसेच आम्हाला अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मोर्चा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
लाँग मार्चमध्ये लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच सहभागी झाले आहेत. त्यातच पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे माताभगिणींसह लहाण मुलांची परवड होताना दिसत आहे. त्यात प्रशासनकाडून अजूनही ठोस माहित मिळत नसल्याने आंदोलनकर्त्या महिला आक्रमक झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारा सन्मान निधी आम्हाला नको, असा निर्धार महिलांनी केला आहे.