गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुर्तीकारांची सध्या लगबग सुरू आहे. साताऱ्यात (Satara Vishesh) सुद्धा विविध रुपांमध्ये गणपतीच्या मुर्त्या घडवल्या जात आहेत. याच दरम्यान सर्व सातारकरांसाठी एक आनंदाची बातमी आली असून साताऱ्याची लेक आणि मातीतून कलाकृती घडवणारी उद्योजिका अंजना शंकर कुंभार यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी अंजली कुंभार यांना निमंत्रण पत्रिका दिली.
अंजना शंकर कुंभार या साताऱ्यातील परळीच्या रहिवासी आहेत. त्यांच्या यशामध्ये उमेद अभियनाचा खारीचा वाटा राहिला आहे. या अभियानाअंतर्गत त्यांना मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी मार्गदर्शनातून यशाचा पाया रचला. लखपती दीदी या योजनेतून त्यांनी त्यांच्या महिला बचत गटासाठी कर्ज घेतलं होतं. घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी योग्य मार्गावर वळवली आणि आपला पारंपरिक व्यवसाय वृद्धिगंत करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. सुरुवातीला गावात आणि त्यानंतर पुणे, मुंबई, पाटण आणि साताऱ्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी व्यवसायाची पाळेमुळे वाढवली. त्यांच कार्य सर्व महिलांना प्रेरणा देणार ठरलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.
राष्टपती सचिवलायकाडून त्यांना विशेष निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती. ही निमंत्रण पत्रिका टपाल विभागाने अंजना कुंभार यांच्या घरी जाऊन त्यांना दिली आहे. डाकघराचे प्रवरा अधीक्षक रत्नाकर टोपोरे, उपाधीक्षक मुयरेश कोले आणि सहाय्यक अधीक्षक संदीप घोडके यांनी अंजना कुंभार यांच्या घरी जाऊन निमंत्रण पत्रिका देत आपलं कर्तव्य पार पाडलं. निमंत्रण पत्रिका पाहताच कुंभार कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.