Satara News – जिल्हा परिषद अध्यक्षपदात वाई-खटावचा दबदबा कायम; सर्वाधिक वेळा अध्यक्षपद कुणाच्या नावावर?

सातारा (Satara News) जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रिया शिंदे यांची निवड होताच वाई आणि खटाव तालुक्यांचा राजकीय दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. खटाव तालुक्याला हे अध्यक्षपद चौथ्यांदा मिळाले असून, वाई तालुक्यासह या दोन्ही तालुक्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.

१९६२ पासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद कारभारात आतापर्यंत १९ अध्यक्ष झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक संधी वाई तालुक्याला चार वेळा मिळाली आहे. फलटणला तीन वेळा संधी मिळाली, तर इतर तालुक्यांना मर्यादित प्रतिनिधित्व मिळाले आहे. विशेष म्हणजे, मागील चार वर्षे जिल्हा परिषद प्रशासक राजवटीखाली होती. फेब्रुवारीत ६५ गटांसाठी निवडणूक पार पडल्यानंतर आता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीने पुन्हा राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत.

दरम्यान, लक्ष्मणराव पाटील यांनी १९८० ते १९९० या कालावधीत तब्बल १० वर्षे अध्यक्षपद भूषवून सर्वाधिक काळाचा विक्रम केला आहे.

महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत पाहता, २००२ पर्यंत पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या पदावर आतापर्यंत फक्त सहा महिलांना संधी मिळाली आहे. डॉ. प्रिया शिंदे या १९व्या अध्यक्षा ठरत असून, १२ वर्षांनंतर महिलेला पुन्हा ही संधी मिळाली आहे.

(Source – लोकमत)

error: Content is protected !!