Surekha Yadav- आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक आणि सातारची लेक सुरेखा यादव निवृत्त होणार

आशिया खंडातल्या पहिल्या महिला रेल्वे चालक मराठमोळ्या सुरेखा यादव (Surekha Yadav) या 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. Central Railway ने आपल्या सोशल मीडियावर त्यांचे काही खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुरेखा यादव यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून कायम ओळखला जाईल, असही पोस्टमध्ये म्हटलं आहे.