22 Yard Cricket Carnival या रबर बॉल क्रिकेट (Tennis Cricket News) स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलाय ‘वाई 11’. नवी मुबंईतील कोरपखैरणेमध्ये असलेल्या भूमीपुत्र मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 8 संघांचा दोन दिवस थरार रंगला. रविवारी (21 सप्टेंबर 2025) पार पडलेल्या अंतिम सामन्यात वाई 11 विरुद्द कोयना किंगस्टार असा सामना रंगला. या सामन्यात वाईने बाजी मारली आणि 36 धावांनी 22 यार्ड क्रिकेट कार्निव्हल स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं.
आठ संघांमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी तुंबळ युद्ध पाहायला मिळाल. परंतु अंतिम फेरीत पोहोचण्याचा बहुमान पटकावला तो वाई 11 आणि कोयना किंगस्टार या संघांनी. अंतिम फेरीत टॉस जिंकून कोयना किंगस्टार संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वाई 11 संघाची तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीला आलेल्या सुरज पाटील आणि तेजस शिंदे यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. सुरज पाटीलने 8 चेंडूंमध्ये 23 आणि तेजस शिंदेने 8 चेंडूंमध्ये 16 धावा चोपून काढल्या. त्यामुळे वाईने प्रथम फलंदाजी करताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा करत कोयना किंगस्टार संघाला 69 धावांच आव्हान दिलं होतं. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना कोयना किंगस्टार संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. वाई 11 च्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे कोयना किंगस्टार संघाला 5 षटकांमध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 33 धावा करता आल्या.
अशाच स्वरुपाच्या टेनिस क्रेकेटच्या बातम्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्राचा क्रिकेट थरार अनुभवण्यासठी आपल्या वॉट्सअॅप चॅनलला फॉलो करा