Video – डॉक्टर नव्हे देवदूतच; Heart Attack आला आणि…; 22 सेकंदाचा थरार CCTV कॅमेऱ्यामद्ये कैद

हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वेगाने वाढली आहे. अशा अनेक घटना CCTV कॅमेऱ्यामद्ये कैद झाल्या आहेत. मैदानावर खेळाताना, मंचावर भाषण करताना, जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर किंवा माध्यमांवर व्हिडीओ पाहिले असतील. आता अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 22 सेकंदाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. डॉक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण थोडक्यात बचावल आहे. त्यामुळे डॉक्टरचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.