Wai Accident News – तालुक्यात दोन अपघातांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू, कवठे गावातील एकाचा समावेश

एकीकडे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. तर दुसरीकडे वाई (Wai Accident News) तालुक्यात दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वेळे आणि जोशीविहीर गावांच्या हद्दीत झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात मृत्यू झालेला एक तरुण कवठे आणि एक तरुण कोरेगाव तालुक्यातील सोनके गावातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) सकाळच्या सुमारास श्याम वाईकर (21) हा त्याचा मित्र आकाश भोसले याच्यासोबत दुचाकीवरून शिरवळहून साताऱ्याच्या दिशेने जात होता. याच दरम्यान वेळे गावच्या हद्दीत ते आले असता श्यामचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला जाऊन धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होती. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान श्याम वाईकर या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिकअप चालक प्रवीण तानाजी धुमाळ (27) याच्यावर भुईंच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सोमवारी (18 ऑगस्ट 2025) जोशिविहीर गावाच्या हद्दीत योगश जगताप यांची दुचाकी उभ्या कंटेनरला धडकली आणि ते खाली पडले याच दरम्यान मागून येणारी गाडी त्यांच्या डोक्यावरून गेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत. (सोर्स – पुढारी)