Wai Crime वाई शहरातील गंगापुरीत भरदिवसा चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सृष्टी अपार्टमेंटमधील दोन बंध घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 19 तोळे सोन्याची दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. जवळपास 14 लाख 90 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशार धनाजी जरंडे (आसरे, वाई) आणि त्यांच्या पत्नी विनिता जरंडे हे दोघेही शिक्षक आहेत. विशाल जरंडे हे उंबरवाडी (वेलंग) आणि विनिता जरंडे या कोंढवली शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत. गुरुवारी (17 जुलै 2025) दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊच्या सुमारास घर बंद करून शाळेत गेले होते. चोरट्यांनी याच वेळी डाव साधत चोरी केल्याचे सांगतिले जात आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान जरंडे दांम्पत्याच्या शेजारी राहाणारे अक्षय सणस घरी आले असता घर फोडल्याची माहिती झाली. त्यानंतर जरंडे दांम्पत्याला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलिसनांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच अक्षय सणस यांच्या घरातून सुद्धा 10 हजार रुपायांची चोरी करण्यात आली आहे.
Wai News – खेळता खेळता गळफास लागला आणि चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; जांब गावावर कोसळला दु:खाचा डोंगर
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून चोरीच्या तपासासाठी ठसेतज्ञ आणि श्वानपथक मागविण्यात आले आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमरे नसल्यामुळे तपास करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत.