Wai News – वाई तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर; वीज पडल्याने 15 हून अधिक मेंढ्या ठार, मेंढपाळ पिसाळ जखमी

वाई (Wai News) तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आसले (ता. वाई) येथील पांडवनगर परिसरात शेतात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळली. या घटनेत 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पिसाळ हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा फटका बसला आहे.

दरम्यान, खंडाळा तालुक्यातही अशाच दुर्घटना घडल्या आहेत. कराडवाडी येथे शेळ्या चारत असताना एका महिलेचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला, तर मोर्वे परिसरात मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळून आणखी 9 मेंढ्या दगावल्या. या घटनांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत वादळी पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान वाढले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!