Wai News – वाई तालुक्यातील वेलंग गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा Video

वाई (Wai News) तालुक्यातील वेलंग गावाच्या हद्दीमध्ये बिबट्या आढळून आल्याने खळबल उडाली आहे. सोमवारी (18 डिसेंबर 2025) सायंकाळी 6.15 च्या सुमारास सणसवाडी येथील डोंगर परिसरात बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला. गेल्या काही दिवसांमध्ये वाई, पांचगणी आणि महाबळेश्वरमध्ये नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. 

वाई तालुका आणि परिसरात बिबट्या वारंवार दिसत आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील अलीकडच्या काळात घडल्या आहेत. अशी परिस्थिती असताना वनविभाग व प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाताना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. पिंजरे लावणे, गस्त वाढवणे तसेच नागरिकांना सतर्कतेबाबत मार्गदर्शन करणे या उपाययोजनांसह प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हालचाल करावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!