Wai News – दह्याट गावचा अभिमान; न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावची जान्हवी धनावडे महाराष्ट्र पोलीस दलात

वाई (Wai News) तालुक्यातील दह्याट गावच्या मातीतून घडलेली शेतकरी कुटुंबातील जिद्दी लेक कुमारी जान्हवी बाबुराव धनावडे हिने आपल्या कष्ट, चिकाटी आणि क्रीडाप्रतिभेच्या जोरावर थेट महाराष्ट्र पोलीस दलात झेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत तिने गाठलेलं हे यश आज संपूर्ण दह्याट गावासाठी अभिमानाचा क्षण ठरलं आहे.

प्रगतशील शेतकरी सौ. संगीता आणि श्री बाबुराव गणपत धनावडे यांची कन्या असलेल्या जान्हवीने प्राथमिक शाळा दह्याट आणि न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव येथे शिक्षण घेतलं. शालेय जीवनातच तिने क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती.

न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावच्या समृद्ध क्रीडा परंपरेतून घडलेली जान्हवी ही आणखी एक मानाचा तुरा ठरली आहे. या आधीही अनेक खेळाडूंनी संरक्षण दलात यश संपादन करून शाळेचं नाव उंचावलं आहे. फक्त संरक्षणच नव्हे तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. त्या उज्ज्वल परंपरेत आता जान्हवीचं नावही अभिमानाने जोडले गेलं आहे.

Wai News – न्यू इंग्लिश स्कूल बोरगावच्या यशदाची गरूड झेप; रौप्य जिंकले आता चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधीत्व

अथक मेहनत, जिद्द आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती याच्या जोरावर जान्हवीने हे यश संपादन केलं आहे. तिच्या या यशामुळे केवळ शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण दह्याट गावाचा गौरव वाढला असून अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा मिळाली आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!