Wai News – टाळ मृदुंगाच्या गजरात वयगावकरांनी साजरा केला दत्त जयंती सोहळा, आज रंगणार खेळ पैठणीचा

वाई (Wai News) तालुक्यातील मौजे वयगांव गावामध्ये गुरुवारी (4 डिसेंबर 2025) दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती सोहळा पार पडला. दत्त जयंतीनिमीत्त मोठ्या संख्येने वयगांवकरांनी हजेरी लावली होती. शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने गावाबाहेर असलेला तरूण दत्त जयंतीनिमित्त वयगांवमध्ये दाखल झाला. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस प्रवचन, किर्तन आणि भजनाच्या तालावर दत्तभक्तांनी मनमुराद आनंद लुटत दत्तांचा सहवास प्रत्यक्ष अनुभवला. यंदा वयगांवमध्ये प्रथमच महिलांसाठी विशेष होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गुरुदत्त कला क्रीड मंडळ, वयगांव आयोजित होम मिनिस्टरचा कार्यक्रम शुक्रवारी (5 डिसेंबर 2025) सायंकाळी 5.30 ते 9.00 या दरम्यान दत्त मंदिरामध्ये पार पडणार आहे. मानाची पैठणी साडी ते फ्रीज, टीव्ही, मोबाईल अशा विविध बक्षिसांची लयलूट होम मिनिस्टरमध्ये करण्यात येणार आहे. 

error: Content is protected !!