Wai News – वयगांवकरांच्या एकीचे बळ; मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत श्रमदानातून बंधाऱ्याचे बांधकाम, पाहा Photo

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विविध समाजउपयोगी उपक्रम राबवविले जात आहेत. वाई तालुक्यातील वयगांव हे गाव या उपक्रमांमध्ये सध्या आघाडीवर आहे.

(फोटो सौजन्य – ग्रामपंचायत वयगांव)

सरपंच आणि उपसरपंचांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचा सुद्धा या सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. असाच एक उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकारने राबविण्यात आला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी गावातील सर्व नागरिक एकवटले.

Wai News – वाई आगारातील चालक-वाहकाचा प्रामाणिकपणा; प्रवाशाचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स केली परत

वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री पंचायतराज अभियानातंर्गत दर मंगळवारी श्रमदान करण्यासाठी लहाणांपासून ते मोठ्यापर्यंत ग्रामस्थ एकवटतात.

सर्व ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकीमुळे बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल. 

त्याचबरोबर गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळित होईल, तसेच शेतकऱ्यांना सुद्धा शेतीच्या कामासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. ग्रामस्थांच्या या उपक्रमाच सध्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. 

error: Content is protected !!