सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यांवर सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरता नदीपात्रामध्ये 4020 क्युसेकने विसर्ग सुरू होता. परंतु पावसाची संततधार सुरू असल्यामुळे 5052 क्युसेकने विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालय यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
जिल्हा माहिती कार्यालय, सातारा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. धोम बलकवडी धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये चालु असलेला एकूण 4020 क्युसेक विसर्ग वाढवून एकूण 5025 क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
धोम बलकवडी धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करणेकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये चालु असलेला एकुण 4020 क्युसेक विसर्ग वाढवून एकूण 5025 क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) August 19, 2025