Wai Rain News मागील काही दिवसांपासून सातारा जिल्हाात पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाबळेश्वरसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिरामध्ये पाणी शिरलं आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर नदीच पाणी मंदिराशेजारी असणाऱ्या दुकानांमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धोम धरणातून 8700 क्युसेकने पाच वक्र दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाईतील अनेक छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच प्रमाण वाढलं आहे. कृष्णा नदीच्या पाणी पात्रात प्रचंड वाढ झाली आहे. चिंदवली, खडकी या गावचे पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच वाईतील प्रसिद्ध छोट्या पुलाला लागून सध्या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर छोटा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.