What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व

पंचायत समिती (What Is Panchayat Samiti) निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. पुढील काही दिवसांमध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. तत्पूर्वी एक जागरूक मतदार म्हणून पंचायत समिती म्हणजे काय? पंचायत समितीचा इतिहास काय आहे? पंचायत समितीची रचना कशी आहे? या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असली पाहिजे. फक्त पंचायत समिती सदस्य निवडणून दिला म्हणजे झालं, असं नाही. तर पंचायत समितीचे कामकाज कशा पद्धतीने चालतं याची सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. या विशेष लेखामध्ये आपण याचीच माहिती जाणून घेणार आहोत. 

पंचायत समिती म्हणजे काय? What is Panchayat Samiti

पंचायत समिती तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पंचायत समिती गावपातळीवरील ग्रामपंचायती आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकाय योजना राबवायच्या असतील किंवा गावाच्या समस्या जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवायच्या असतील तर सर्व प्रथम पंचायत समितीकडे त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे माहिती पोहचवली जाते. त्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत मंजुर झालेला निधी, योजना पंचायत समिती ग्रामपंयातींपर्यंत पोहोचवते. 

पंचायत समितीचा थोडक्यात इतिहास | What is Panchayat Samiti History

भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना ब्रिटिश काळापासून सुरू झाली, परंतु ती खरी बळकट झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समित्यांपैकी एक असलेल्या बलवंतराय मेहता समितीने 1952 साली ‘त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली” सुचवली. त्रिस्तरीय म्हणजेच ग्रामपंचायत → पंचायत समिती → जिल्हा परिषद. बलंवतराय महेता समितीची शिफारस सरकारने स्विकारली आणि महाराष्ट्र सरकारने “महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961” तयार केला. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत 1962 पासून “महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961” हा कायदा लागू झाला आणि त्यानुसार सर्व तालुक्यांमध्ये पंचायत समित्यांची स्थापना झाली. 

पंचायत समितीचे कार्य 

पंचायत समिती ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या विकासाची जबाबदारी घेते. ग्रामपंचायतीच्या अडचणी सोडवण्याचे काम पंचायत समितीचे असते. तिचे कार्य पुढीलप्रमाणे. 

  • विकास व प्रशासन
  • ग्रामपंचायतींच्या योजनांची अंमलबजावणी व समन्वय
  • रस्ते, पाणीपुरवठा, नाले, वीज, बाजारपेठ आदी विकासकामांची अंमलबजावणी
  • ग्रामीण गृहनिर्माण योजना व स्थानिक बांधकाम नियंत्रण

शेती व उद्योग

  • शेतीसंबंधित प्रशिक्षण, खत/बियाणे वितरण, कृषी कार्यालयीन कामे
  • दुग्ध व्यवसाय, लघुउद्योग, पशुसंवर्धन व मच्छीमार विकास

आरोग्य व शिक्षण

  • प्राथमिक आरोग्य केंद्रांचे व्यवस्थापन
  • तालुका आरोग्य अधिकारी मार्फत आरोग्य मोहीम
  • प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे नियंत्रण

सामाजिक व कल्याणकारी योजना

  • महिलांसाठी स्वयंरोजगार योजना
  • अपंग, विधवा व वृद्धांसाठी योजनांची अंमलबजावणी
  • ग्रामसभा निर्णयांचे पालन व अंमलबजावणी

पंचायत समितीचे अधिकार

  • तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकीय देखरेख ठेवणे.
  • विकासकामांसाठी निधीचे नियोजन व वितरण करणे.
  • जिल्हा परिषदेकडून आलेल्या योजना मंजूर करून अंमलात आणणे.
  • तालुका-पातळीवरील विविध विभागांचे (शेती, आरोग्य, शिक्षण, बांधकाम इ.) नियंत्रण ठेवणे.
  • तालुका अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या शिफारसीने शासनाला अहवाल देणे.

सदस्यसंख्या व रचना | Who are the members of Panchayat Samiti

पंचायत समितीची रचना पुढीलप्रमाणे असते

घटक भूमिका
सभापती (Chairman) समितीचा प्रमुख अधिकारी
उपसभापती (Deputy Chairman)  सभापतीच्या अनुपस्थितीत काम पाहतो
सदस्य (Members) तालुक्यातील निवडून आलेले प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य  तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य समितीवर असतात
सहकारी अधिकारी  गटविकास अधिकारी (BDO), विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी इ.

 

सदस्य संख्या | How many members in Panchayat Samiti

सदस्यांची अचूक संख्या तालुक्यातील लोकसंख्येवर आणि ग्रामपंचायतींच्या संख्येवर अवलंबून असते. साधारणपणे 15 ते 25 सदस्य असतात.

प्रमुख अधिकारी

  • गटविकास अधिकारी (BDO) — पंचायत समितीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी.
  • तो समितीच्या सर्व योजना, बजेट आणि विकासकामांचे व्यवस्थापन करतो.

त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली

स्तर  संस्था  प्रमुख
ग्रामस्तर  ग्रामपंचायत  सरपंच
तालुका स्तर पंचायत समिती सभापती
जिल्हा स्तर जिल्हा परिषद  अध्यक्ष

पंचायत समिती निवडणूक किती वर्षांनी होते

निवडणूक कालावधी  प्रत्येक ५ वर्षांनी एकदा पंचायत समितीची निवडणूक होते.
कायदा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961 या कायद्याच्या तरतुदीनुसार.
निवडणूक नियंत्रण राज्य निवडणूक आयोग (State Election Commission, Maharashtra) पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांच्या निवडणुका आयोजित करते.
मतदार पात्रता संबंधित तालुक्यातील नोंदणीकृत मतदार (१८ वर्षांवरील नागरिक).
कार्यकाळ निवडून आलेल्या पंचायत समितीचा कार्यकाळ ५ वर्षे असतो.
वाढीव कालावधी विशेष परिस्थितीत (जसे की आपत्ती, न्यायालयीन स्थगिती, आपत्कालीन स्थिती इ.) सरकार किंवा निवडणूक आयोग ६ महिने पर्यंत मुदतवाढ देऊ शकतो.