Wai News – स्व. यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा! वयगांव ZP शाळेच्या रुद्र आणि सोहमची जिल्हास्तरासाठी निवड

सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावर स्व.यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वाई तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विध्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वयगांवच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत शाळेतील सहा विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले होते. 

लांब उडी, बुद्धीबळ, थाळीफेक, धावणे या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. लांब उडी स्पर्धेत रुद्र जंगम याने प्रभावी कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. तर 200 मीटर धावण्यात सोहम वाडकर याने वेगावर स्वार होत दुसरे स्थान पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

इतर विद्यार्थ्यांचीदेखील उल्लेखनीय कामगिरी 

संस्कृती वाडकर (थाळी फेक) – चौथा क्रमांक

श्रेया वाडकर (200 मीटर धावणे) – चौथा क्रमांक

प्रणव वाडकर (बुद्धिबळ) – पहिल्या फेरीत विजय

पार्थ वाडकर (लांब उडी) – पाचवा क्रमांक

सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडाभाव, शिस्त आणि उत्साहातून स्पर्धा गाजवली. वयगाव ZP शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मुलांनी तालुकास्तरावर दमदार कामगिरी केली आहे. रुद्र जंगम आणि सोहम वाडकर यांची जिल्हास्तरासाठी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!