79th independence day India – लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन महत्त्वपूर्ण घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 व्या वेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आहे. त्याचबरोबर मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनानमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि दोन महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केल्या आहेत.  (79th independence day India )

या दिवाळीत सरकार GST सुधारणा आणत आहे. यामुळे लोकांना करातून दिलासा मिळेल.

आजपासून देशभरात “प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना” लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून 15000 रुपये दिले जातील. सरकार त्या कंपन्यांनाही प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे देशातील 3.5 कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

ELI Scheme – पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांची होणार दणक्यात सुरुवात! मिळणार 15 हजार रुपये, EPFO च्या योजनेला सुरुवात