Wai News – वाई MIDC परिसरात ड्रोन साहित्याची चोरी; 40–50 हजारांचे नुकसान

वाई (Wai News) येथील MIDC परिसरात ड्रोन संबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. सुशीला मंगल कार्यालय परिसरात १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी DJI Air 3 ड्रोनची बॅग, दोन ओरिजिनल बॅटऱ्या, ओरिजिनल चार्जर, ND फिल्टर तसेच मेमरी कार्ड असा मुद्देमाल लंपास केला. या चोरीत अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ड्रोनचे मालक अभिषेक साहेबराव सणस यांनी संबंधित साहित्याबाबत माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक: 9511681385.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!