Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan – अमेरिकेन खासदाराच्या साहित्यकृतीचे होणार प्रकाशन, आंतरराष्ट्रीय पटलावर सातारा झळकणार!

साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) वारे वाहू लागले आहेत. आज पासून (1 जानेवारी 2026) साहिस्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. जवळपास 32 वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर सुद्धा सातारा जिल्हा अभिमानाने झळकणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये अमेरिकन खासदार क्षीनिवास ठाणेदार उपस्थित राहणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीनिवास ठाणेदार यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन या साहित्य संमेलनामध्ये होणार आहे.

‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारपासून चार दिवस हे संमेलन चालणार आहे. विशेष म्हणजे हे संमेलन सर्वांसाठी खुले असून मोठ्या संख्येने रसिक, लेखक, साहित्यिक, विद्यार्थी या संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या संमेलनामध्ये अमेरिकन खासदार श्रीनिवास ठाणेदार उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘प्रकाशन कट्टा’ या कार्यक्रमात श्रीनिवास ठाणेदार यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय साताऱ्याचे नाव झळकणार असून सातारकरांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

error: Content is protected !!