आशिया (Asia Cup 2025) चषकाचा रणसंग्राम 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. टी-20 स्वरुपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मंगळवारी (19 ऑगस्ट 2025) बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी आणि शुभमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
आशिया चषकासाठी टीम इंडियाची यंग ब्रिगेड आता सज्ज झाली आहे. सूर्यकुमार यादवसह तडाखेबाज फलंदाजी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. टीम इंडियाचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराचा सुद्धा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र दमदार कामगिरी करूनही यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि ऋतुराच गायकवाड यांना संघात स्थान न दिल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आशिया चषकासाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह.
🚨 A look at #TeamIndia‘s squad for #AsiaCup 2025 🔽 pic.twitter.com/3VppXYQ5SO
— BCCI (@BCCI) August 19, 2025