Dahi Handi – हा गोविंदा कोणाचा… 87 वर्षांच्या आजोबांनी फोडली दहीहंडी, पाहा हा हटके Video

दहीहंडाचा (Dahi Handi) थरार नुकताच पार पडला. कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांची सलामी देत विश्वविक्रम केला तर, जय जवान गोविंदा पथकाने सलग 3 वेळा 10 थार लावत साऱ्या जगाला चकित केलं. तसेच अनेक पथकांनी 8 ते 9 थरांची सलामी दिली. गोविंदाच्या खांद्याला खांदा लावत गोपिकांची पथके सुद्धा या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने यंदा सहभागी झाली होती. मुंबईतील पार्ले स्पोर्ट्स क्लब या महिलांच्या पथकाने भारतातील पहिले 7 थर लावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. सगळीकडे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत होता. याच दरम्यान लक्ष वेधून घेणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 87 वर्षांच्या आजोबांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by तांबळई (@tambalai_chi_por)

पालघर माही (तांबळाई) या गावातील भालचंद्र चुरी या 87 वर्षांच्या आजोबांना दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आहे. दहीहंडी फोडत असताना आजोबांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा होता. रोजच्या सामान्य जीवनात जगत असताना असा एक क्षण वयस्कर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक प्रकाश टाकणार ठरतो. तरुणांसाठी सुद्धा आजोबांचा हा उत्साह प्रेरणा देणारा आहे. विशेष बाब म्हणजे हे आजोबा टीम इंडियाचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूर यांच्या गावातील आहेत.