Benefits of Strawberry – मुंबईच्या धावपळीत फिट राहायचंय? स्ट्रॉबेरी खा! लगेच क्लिक करा आणि हे 7 फायदे जाणून घ्या

मुंबई म्हंटल की धावपळ, ट्रॅफिक, कामाचा ताण, वेळेची कमतरता, ट्रेन पकडण्याचं टेंशन आणि बरच काही. कुटुंबाच्या सुखासाठी मुंबईकरांची दररोज तारेवरची कसरत सुरू असते. मात्र, या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष होतं. भुक लागली की तेलकट पदार्थांवर ताव मारला जातो. जंकफुडचं अतिसेवन आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे फळं खाण्यास प्रथम प्राधान्य देणे. सध्या स्ट्रॉबेरीचा (Benefits of Strawberry) हंगाम सुरू आहे. शरीराला हवी असलेली ऊर्जा, पोषण आणि ताजेपणा यासाठी स्ट्रॉबेरी हा उत्तम आणि सोपा पर्याय नक्कीच ठरू शकतो. 

स्ट्रॉबेरी खाण्याचे 7 भन्नाट फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते.

  • सर्दी-खोकला कमी होण्यास मदत
  • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

हृदयासाठी उपयुक्त

  • स्ट्रॉबेरी रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करते
  • रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत
  • हृदयविकाराचा धोका कमी होतो

मधुमेह असणाऱ्यांसाठी सुरक्षित

  • स्ट्रॉबेरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो
  • रक्तातील साखर हळूहळू वाढते
  • डायबेटीस असणारेही मर्यादेत खाऊ शकतात

वजन कमी करण्यास मदत

  • कॅलरी कमी आणि फायबर जास्त
  • पोट लवकर भरल्यासारखे वाटते
  • डाएटमध्ये उत्तम पर्याय

त्वचा उजळ आणि निरोगी ठेवते

  • अँटीऑक्सिडंट्समुळे एजिंग प्रक्रिया मंदावते
  • त्वचा चमकदार व ताजीतवानी राहते
  • मुरुम कमी होण्यास मदत

पचनक्रिया सुधारते

  • फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी
  • पोट साफ राहण्यास मदत

कॅन्सरपासून संरक्षण

  • स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स
  • शरीरातील हानिकारक घटकांशी लढण्यास मदत करतात

मेंदूसाठी फायदेशीर

  • स्मरणशक्ती सुधारते
  • तणाव कमी होण्यास मदत
  • एकाग्रता वाढते

थोडक्यात सांगायचं झालं तर, मुंबईच्या धावपळीत फिट, फ्रेश आणि हेल्दी राहायचं असेल तर रोजच्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करा. चव आणि आरोग्य यांचा परफेक्ट मेळ म्हणजे स्ट्रॉबेरी. सध्या हंगाम सुरू आहे त्यामुळे स्ट्रॉबेरीवर ताव मारण्यास हयगय करू नका… 

तुम्हाला प्रश्न पडला असेल फ्रेश,  रसाळ आणि ताजी स्ट्रॉबेरी मिळणार कुठे? टेंशन घेऊ नका खाली दिलेल्या लिंकवर लगेच क्लिक करून आपली ऑर्डर बुक करा

मुंबई –  GK Farm 

पुणे – Sattva Fresh 

error: Content is protected !!