पुणेकरांची दुपारची झोप जगभरात प्रसिद्ध आहे. पण ही दुपारची नियमीत झोप आरोग्यतज्ञांच्या मते शरीरासाठी घातक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईसारखीच पुणे शहरातही धावपळीच जीवन पाहायला मिळत आहे. कामांची अनियमित वेळ, ऑफिसमध्ये तासंतास एकाजागेवर बसून काम करण्याची सवय. या सर्व गोष्टींमुळे आळस, झोप येणं, कामात लक्ष न लागणं अशा तक्रारी जाणवतात. याचा परिणाम म्हणजे दुपारची झोप. परंतू दुपारची नियमित झोप घेतल्यास पचनक्रिया मंदावते, वजन वाढू शकते आणि सर्वात महत्त्वाचं याचा परिणाम रात्रीच्या झोपेवरही होऊ शकतो.
यावर उपाय काय? तर नैसर्गिक, चविष्ट आणि आरोग्यदाई स्ट्रॉबेरी… (Benefits of Strawberry)
दुपारच्या झोपेवर स्ट्रॉबेरी का उत्तम पर्याय आहे?
स्ट्रॉबेरी हे फळ केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि नैसर्गिक साखर असते. त्यामुळे दुपारच्या वेळेत शरीराला ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर ताजतवानं राहतं. दुपारचं जेवण पोटभर केल्यानंतर झोप येणं स्वाभाविक आहे. झोप टाळण्यासाठी चहा किंवा कॉफीला प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतू चहा आणि कॉफीऐवजी तुम्ही ताज्या स्ट्रॉबेरी खाल्ल्यास शरीराला लगेच ऊर्जा मिळते आणि झोप सुद्धा झटकन नाहीशी होते. स्ट्रॉबेरी मेंदूला सतर्क ठेवण्यास मदत करते आणि यामुळे कामावर लक्षही केंद्रित होतं.
दुपारची झोप आणि स्ट्रॉबेरी
दुपारी झोपण्याच्या सवयीमुळे गॅस, अॅसेडिटी किंवा अपचन यासारख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही जर दुपारच्या वेळेस स्ट्रॉबेरी खाल्ली तर स्ट्रॉबेरीतील फायबर पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे गॅस, अॅसेडिटी किंपा अपचन अशा समस्या कमी होऊ शकता. तसेच स्ट्रॉबेरमध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते. शरीराला फिट ठेवण्यासाठी स्ट्रॉबेरी हा उत्तम पर्याय आहे.
पुणेकरांसाठी खास सल्ला
दुपारी झोपण्याऐवजी 5–10 मिनिटं चालणं, थोडं स्ट्रेचिंग करणं आणि त्यासोबत ताज्या स्ट्रॉबेरी खाण्याची सवय लावा. यामुळे दिवसभर उत्साह टिकून राहील.
तुम्हाला प्रश्न पडला असेल फ्रेश, रसाळ आणि ताजी स्ट्रॉबेरी मिळणार कुठे? टेंशन घेऊ नका खाली दिलेल्या लिंकवर लगेच क्लिक करून आपली ऑर्डर बुक करा
पुणे – Sattva Fresh
मुंबई – GK Farm