Blockchain; विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणारे क्षेत्र

मागील 10 ते 12 वर्षांमध्ये blockchain technology मध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्याचा विचार केला, तर तंत्रज्ञानात दुप्पट वेगाने विकास होणार असल्याचे जाणकारांनी भाकीत केले आहे. याच तंत्रज्ञानाच्या गोतावळ्यात Blockchain तंत्रज्ञानाने सुद्धा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 10 वर्षांपूर्वी आलेले हे तंत्रज्ञान जगभरामध्ये दुप्पट वेगाने प्रचलित झाले आहे. ब्लॉकचेनचा विचार केला, तर हे तंत्रज्ञान अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे या श्रेत्रामध्ये अद्याप म्हणावी तशी स्पर्धा नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि सर्वांचाच गैरसमज होतो की, Bitcoin आणि Blockchain हे तंत्रज्ञान म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु तसे अजिबात नाही. बिटकॉईनची प्रतिष्टा जगभरामध्ये नकारात्मक स्वरूपाची आहे. त्या तुलनेत ब्लॉकचेन तंत्रज्ञान मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये उपयुक्त ठरत आहे. Amezon, Wipro, Tech Mahindra इ. अशा नामांकीत कंपन्या उमेदवारांच्या शोधात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये आपलं भविष्य घडवण्याची चांगली संधी आहे.

What is Blockchain?

ब्लॉकचेन Technology ही एक प्रकारची Digital Ledger Technology आहे. यामध्ये माहिती आणि व्यवहारांचे रेकॉर्ड ठवले जातात. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर हे तंत्रज्ञान Google Docs प्रमाणे काम करते. पण गुगल डॉक्सपेक्षा ब्लॉकचेन तंत्रज्ञान कित्येक पटीने प्रगत आणि गुंतागुंतीचे आहे. ब्लॉकचेनमध्ये माहिती आणि व्यवहाराचं रेकॉर्ड सुरक्षित असतं, कारण यामध्ये असणारे डॉक्युमेंट्स किंवा माहितीत बदल करणे, हॅक करणे, करप्ट करणे किंवा डिलिट करणे खूप अवघड असते. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे एक प्रकारे Decentralized Distribution Network आहे. हे तंत्रज्ञानात एकाच साखळीमध्ये ब्लॉक्सच्या स्वरुपात अनेक व्यवहारांची नोंद करत. म्हणजेत ब्लॉकचेनवर असणाऱ्या सर्व कम्प्युटर सिस्टीमच्या नेटवर्कवर हे सर्व व्यवहार कॉपी आणि पेस्ट केले जातात.

ब्लॉकचेनवर जेव्हा नव्याने एखादी फाईल किंवा व्यवहार केला जातो, तेव्हा ब्लॉकचेन साखळीतल्या प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या लेजरवर त्याची माहिती जोडली जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे, या सर्व गोष्टी Real Time Update होतात. त्यामुळे कोणतीही व्यक्ती त्यामध्ये बदल करू शकत नाही. याच गोष्टीमुळे ब्लॉकचेनची पारदर्शकता सिद्ध होते. तसेच यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया खूपच किचकट स्वरुपाची आहे. कारण काही बदल करायचा असेल, तर संबंधित ब्लॉकचेनवरच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये बदल करावा लागतो. तसेच, सर्व व्यवहार लेजरमध्ये आणि मालकाच्या डिजिटल सहीने अधिकृत केले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारांमध्ये काही बदल करायचा कोणीही प्रयत्न केल्यास सिस्टीम ते लगेच ओळखते. त्यामुळे ब्लॉकचेन हे एक पारदर्शक तंत्रज्ञान आहे. Bitcoin आणि Ethereum ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित पर्यायी चलन गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर लोकप्रिय झाली आहेत.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सुरक्षित आहे. कारण या तंत्रज्ञानामध्ये फसवणूक-मुक्त व्यवहार करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरीचा वापर केला जातो. तसेच, कोणीही डेटामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तर सर्वांना त्याची सुचना जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानाची विश्वासर्हता जास्त आहे. ब्लॉकचेनच्या माध्यमातून होणारे सर्व व्यवहार वापरकर्त्यांच्या परस्पर सहमतीतून पडताळणी करून केले जातात. त्यामुळे या व्यवहारांमध्ये अन्य तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज भासत नाही. मध्यस्थाशिवाय व्यवहार होत असल्यामुळे सर्व व्यवहार हे जलद गतीने होतात.

Blockchain अभ्यासक्रम

ब्लॉकचेनमध्ये भविष्य घडवण्यासाठी 12वी झाल्यानंतर आणि पदवीपूर्ण झाल्यानंतर प्रवेश घेता येतो. प्रामुख्याने B.Tech.in Blcokchain हा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि क्रिप्टोकरन्सीच्या मूलभुत गोष्टींची माहिती दिली जाते. भारतामध्ये ब्लॉकचेनचा अभ्यासक्रम सुरुवातीच्या स्टेजवर आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये B.Tech ब्लॉकचेन अभ्यासक्रम हा महाविद्यालयांमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगवेगळा असू शकतो. ब्लॉकचेनमध्ये B.Tech करण्याव्यतिरिक्त नवीन विषय म्हणून ब्लॉकचेनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स 2 वर्षांसाठी ऑफर केला आहे. B.Tech CS – Blockchain हा कोर्स काही ठरावीक महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो जसे की, IAM-Kolkata.

Blockchain कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पात्रता

ब्लॉकचेन अभ्यासक्रमांसाठी पात्रता निकष वेगवेगळे आहेत. UPES विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याने इयत्ता 10वी आणि 12वी कमीत कमी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी, हा मुख्य पात्रता निकष आहे. तसेच काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्याने 12वी आणि PCM विषयांमध्ये 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. तर काही विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी 60 ते 70 टक्के गुणांनी 12वी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.

पात्रता निकषांच्या व्यतिरिक्त भारतातील काही विद्यापीठांमध्ये JEE-Main किंवा UPSEE किंवा महाविद्यालयांच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षा असतात. जसे की, शारदा महाविद्यालयाची SUAT प्रवेश परीक्षा. तसेच काही विद्यापीठांमध्ये ब्लॉकचेनला प्रवेश घेण्यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नसते.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानासाठी C++, C#, जावास्क्रिप्ट, पायथॉन, रूपी किंवा Java अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात आपली पकड मजबुत करण्यासाठी विद्यार्थ्याने यापैकी एका किंवा अधिक लँग्वेजेसमध्ये पारंगत असणं गरजेचं आहे.

B.Tech ला प्रवेश घेण्यासाठी भारातील नामांकित संस्था

Sharda University
पात्रता – इयत्ता 10वी 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेले असावी, इयत्ता 12वी 70 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी आणि जर 12वी मध्ये PCB विषयांचा समावेश असेल तर 60 टक्के गुणांनी 12वी उत्तीर्ण कलेली असावी.

Ajeenkya DY Patil University, Pune
पात्रता – इयत्ता 12वी PCB विषयांसह 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.

Srinivas University
पात्रता – इयत्ता 12वी PCB विषयांसह 45 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.

या महाविद्यालयांव्यतिरिक्त ब्लॉकचेनचा अभ्यासक्रम देणारी NorthCap University, UPES ही काही महाविद्यालये आहेत. तसेच भारतामध्ये ब्लॉकचेनचा अभ्यासक्रम शिकवणारी अनेक महाविद्यालये आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पुढील महाविद्यालयांमध्ये ब्लॉकचेन अभ्यासक्रम शिकवला जातो.
• Dr Vishwanath Karad MIT World Peace University, Pune
• MIT School Of Engineering, Pune
• Mumbai University
• VIT Vellore
• SRM University Chennai
• Sathyabama University
• Presidency University, Bangalore
• Techno India University, Kolkata
• Faculty Of Engineering and Technology, Jain University Bangalore

भारतात आणि परदेशात ब्लॉकचेनची व्याप्ती

भारताच्या तुलनेत जगातील इतर देशांनी ब्लॉकचेनचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ब्लॉकचेनची विश्वासर्हता आणि उपयुक्ततेमुळे सरकारे सुद्धा त्याची दखल घेत आहेत. उदाहरण द्यायचे झाले, तर युरोपमधील Estonia या देशाने न्यायव्यवस्था, आरोग्य आणि वाणिज्य विभागामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला आहे. त्याचबरोबर नेदरलँड, USA, दुबई, माल्टा, इस्रायल, स्वीडन, कोलंबिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा सरकारी कामांमध्ये अवलंब केला आहे. भारतात मात्र हे तंत्रज्ञान अजून सुरुवातीच्या स्टेजवर असल्यामुळे सरकारी कामांमध्ये त्याचा वापर करण्यास अद्याप तरी सुरुवात करण्यात आलेली नाही.

ब्लॉकचेनमध्ये करिअर

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये पारंगत असणाऱ्या उमेदवारांची मागणी भारताच्या तुलनेत सध्या परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील बँका कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि वाढीव ऑपरेशनल कॉस्ट कमी करण्यासाठी ब्लॉकचेनचा अवलंब करण्यास हळुहळु प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतामध्ये सुद्धा ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये पारंगत असणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत.

जॉब प्रोफाईल आणि सॅलरी

ब्लॉकचेनचा अभ्यासक्रम यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर विविध जॉब प्रोफाईल्सवर काम करण्यासी संधी निर्माण होते. जसे की, Blockchain Developer, Cryptocurrency Developer, Blockchain Business Analyst, Blockchain Solution Architect, Cryptocurrency Engineer, Digital Transformation Product Manager, Blockchain Subject Matter Expert इ. असे काही जॉब प्रोफाईल्स आहेत. यामधील काही लोकप्रिय जॉब प्रोफाईल्सची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

Blockchain Developer

ब्लॉकचेन डेव्हलपर्सचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे, ब्लॉकचेन प्रोटोकॉल आणि आर्किटेक्चरसाठी विकेंद्रित अॅप्स तयार आणि ऑप्टिमाइज कराणारा व्यक्ती. ब्लॉकचेन डेव्हलपर्सच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे अल्गोरिदम विकसीत करणं, प्रोग्राम करणं, ऑप्टिमाइझ करणं आणि ब्लॉकचेन नोड्सवर चालवणं. त्याचबरोबर यांना 3D Modeling आणि 3D Content डेव्हलप करण्याचे सुद्धा ज्ञान असते. अजूनही तुमच्या ही गोष्ट डोक्यावरून जात असेल, तर याचा थोडक्यात अर्थ म्हणजे ब्लॉकचेन डेव्हलपर्स हे व्हिडीओ गेम डेव्हलपर्सप्रमाणे काम करताता. असे असले, तरी ब्लॉकचेन डेव्हलपर्सने तयार केलेले अॅप्स इतर अॅप्सच्या तुलनेत थोड्या प्रमाणात का होईना वेगळे असतात.

ब्लॉकचेन डेव्हलपर्स प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर्स आणि दुसरे म्हणजे ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्स
1) Core Blockchain Developers – ब्लॉकचेन प्रोटोकॉल आणि नेटवर्क आर्किटेक्चरची रयना तयार करणं, विकसित करणं आणि त्यांचं मॉनिटरिंग करणं हा त्यांच्या कामाचा मुख्य भाग असतो. त्याचबरोबर, Consensun Mechanisms आणि प्रोटोकॉलची देखरेख करणं, विविध फीचर्सची अंमलबजावणी करणं ही कामेदेखील कोअर ब्लॉकचेन डेव्हलपर्स करतो.
2) Blockchain Software Developer – ब्लॉकचेन डेव्हलपर्सनी तयार केलेल्या अल्गोरिदमची अंमलबजावणी करणे आणि त्यांचा अ‍ॅप्लिकेशनमध्ये समावेश करणं, एपीआय विकसित करणे, अ‍ॅपच्या फ्रंटएंड आणि बॅकएंडची रचना आणि विकास करणं, ब्लॉकचेन यंत्रणेवर चालणारे विकेंद्रित अनुप्रयोग विकसित करणं, इत्यादी गोष्टी करण्याची महत्वाची जबाबदारी ब्लॉकचेन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची असते.

भारतामध्ये असणाऱ्या नामांकित कंपन्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये पारंगत असणाऱ्या उमेदवारांच्या शोधात आहेत. त्यामध्ये साधारणपणे Reliance Jio, Microsoft, Amazon, Accenture, Wipro आणि Tech Mahindra या मुख्य कंपन्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये सुद्धा करिअर घडवण्याची चांगली संधी उमेदवारांकडे आहे.

हे सुद्धा वाचा

1) Big Data Analytics course information in Marathi; आयटी उद्योगातील एक वेगाने वाढणारे क्षेत्र

2) Ethical Hacking; भविष्यात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देणार क्षेत्र

3) Animation; करिअरचा एक उत्तम पर्याय

Leave a comment