Animation; करिअरचा एक उत्तम पर्याय

डीजिटल युगात आपले अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आपल्याला सुद्धा काळानुरुप आपल्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. अॅनिमेशन (Animation Information In Marathi) सुद्धा याच आधुनिकतेचं प्रतिक आहे अस म्हंटल तर चुकिचे ठरणार नाही. व्हिडिओ एडिटींग, ग्राफीक डिझायनिंग, डीजिटल मार्केटिंग सारख्या विविध क्षेत्रांबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण अॅनिमेशन हे क्षेत्र या सर्वांपेक्षा हटके आहे. तुम्ही आईस एज (Ice Age), कुंग फू पांडा (Kung Fu Panda), अँग्री बर्ड्स (Angry Birds) तसेच आपल्या मराठी भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अॅनिमेशन चित्रपट तुम्ही पाहीला असेल. हे चित्रपट पाहताना तुम्ही विचार केला असेल हे कस शक्य आहे? या चित्रपटांचे चित्रीकरण कुठे केल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. याच उत्तर म्हणजे अॅनिमेशन (Animation) कारण अॅनिमेशनच्या चमत्कारामुळेच हे शक्य झाले आहे.

ॲनिमेशन उद्योग भारतात झपाट्याने वाढत आहे. विविध संस्था आणि प्रॉडक्शन हाऊस सध्या डिजिटल जगात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे प्रतिभावान ॲनिमेटर्स, डिझायनर आणि सर्जनशील कलाकारांची मागणीही वाढत आहे. रिसर्च अँड मार्केट्सने शेअर केलेल्या अहवालानुसार, भारतीय ॲनिमेशन उद्योग 2025 पर्यंत 26 अब्जांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. मनोरंजन उद्योगाच्या उत्पन्नाचा मोठा भाग ॲनिमेटेड चित्रपटांमधून येतो.

What Is Animation

अॅनिमेशनचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे आपण चित्रपट किंवा एखादी स्टोरी कार्टून, 2D किंवा 3D स्वरुपात पाहतो त्याला अॅनिमेशन म्हंटले जाते. तंत्रज्ञानाच्या मदतीने मजेशीर स्वरुपात स्टोरी प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचे एक साधन म्हणजे अॅनिमेशन. एखादी गाडी, झाडं, पेन, प्राणी या गोष्टी सुद्धा जेव्हा सामान्य माणसांसारख्या संवाद साधतात त्याला अॅनिमेशन म्हंटले जाते. उदा.Tom And Jerry, Noddy इ. हे 90 च्या दशकातील काही कार्टून शो तुम्ही नक्की पाहिले असतील या सर्व गोष्टी अॅनिमेशनमुळे शक्य झाल्या आहेत. थोडक्यात काय तर एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये अॅनिमेशनच्या माध्यमातून प्राण फुंकला जातो.

Eligibility To Become Animator

क्षेत्र कोणतेही असो पात्रता निकष माहित असणे खूप गरजेचे आहे. अॅनिमेटर होण्यासाठी विद्यार्थ्याने काही पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुम्ही 12 वी नंतर अॅनिमेटर होण्यास इच्छूक असाल तर तुम्हाला 12वी 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच जे विद्यार्थी SC/ST/OBC श्रेणीमद्ये मोडत असतील तर संबंधित विद्यार्थ्यांना गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्यात येते. 12वी 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर अॅनिमेशन अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ स्तरावार प्रवेश परीक्षा घेतली जाते.

Skill Required for Animator

अॅनिमेशन या क्षेत्रामध्ये अॅनिमेटर होण्यासाठी क्रिएटीव्ह असणे ही सर्वात महत्वाची अट आहे. अॅनिमेशनमध्ये प्रत्येक गोष्ट नव्याने क्रिएट करावी लागते. त्यामुळेच हे क्रिएटीव्ह क्षेत्र आहे. क्रिएटीव्हीटी हा अॅनिमेशनचा मुख्य पाया आहे असं म्हंटल तर चुकीचे ठरणार नाही. कल्पनाशक्तीच्या जोरावर चांगल्या पद्धतीचे अॅनिमेशन व्हिडिओ बनवले जातात तेव्हा ते प्रक्षकांच्या सुद्धा कायम लक्षात राहतात. पण यासाठी संयम हा खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर योग्य ठिकाणी योग्य ग्राफिक्स सुद्धा वापरता येण गररजेचं आहे. चांगल्या पद्धतीचे अॅनिमेशन, तितकेचं चांगले ग्राफिक्स आणि या दोन गोष्टींना चांगल्या संवाद कौशल्यांची जोड मिळाली की उत्तम कलाकृतीचा आनंद प्रेक्षकांना सुद्धा घेता येतो. अवतार हा इंग्रजी चित्रपट तुम्ही सर्वांनी नक्की पाहिला असेल. या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले अॅनिमेटेड प्राणी तुमच्या आजही लक्षात असतील. त्यामागे प्रचंड मेहनत घेण्यात आली होती. म्हणूनच अवतार हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तुमची सहनशक्ती तपासणार क्षेत्र म्हणजे अॅनिमेशन. त्यासाठी Creativity And Imagination, Drawing Skills, Aptitude for graphics, Attention to detail, Good Communication skills आणि सर्वात महत्वाचे म्हणजे Patience या गोष्टी चांगला अॅनिमेटर होण्यासाठी गरजेच्या आहेत.

Animation Courses

अॅनिमेशम म्हणजे काय? अॅनिमेशनसाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे? या सर्व घटकांची माहिती तुम्हाला आता समजली असेल. आता अॅनिमेशनचा पूढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष अॅनिमेशन शिकण्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत. अॅनिमेशन शिकण्यासाठी कोणते कोर्स करावे लागतात या सर्व घटकांची सविस्तर माहिती पूढे देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नक्की वाचा.

1) Animation Courses After 10th

तुम्ही आता इयत्ता दहावीला असाल आणि अॅनिमेशन या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही योग्य माहिती वाचत आहात. 10वी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च दर्जाचे अॅनिमेशन कोर्स तुमची वाट बघत आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमचा अॅनिमेशन बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू होतो. चांगला पगार मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करण्याची पहिली पायरी म्हणजे विविध कोर्सेस.

इयत्ता 10वी नंतर अॅनिमेशमध्ये करिअर करणाण्यास उत्सुक असणारे विद्यार्थ्यी डिप्लोमा अॅनिमेशन कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणती संस्था निवडत आहात. त्यानुसार अभ्यासक्रम आणि स्पेशलायझेशनमध्ये बदल असू शकतो. पण बऱ्याच संस्थांमध्ये अॅनिमेशनमध्ये करिअर करण्यासाठी असणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये काही मुलभूत विषयांचा समावेश असतो. मुख्य अभ्यासक्रम आणि तूम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला जातो.

मुख्य अभ्यासक्रम

– अॅनिमेशनची बेसिक माहिती : अॅनिमेशनची बेसिक माहिती तुम्हाला यामध्ये शिकवली जाईल.
– ड्राईंग आणि डिझाईन : यामध्या तुमच्यामध्ये असणाऱ्या ड्रॉइंग स्किल, टेक्निक, स्टोरिबोर्डिंग आणि त्याची रचना या सर्व घटकांमधील तुमची कौशल्य विकसीत करण्यास मदर होईल.
– सॉप्टवेअरचे ज्ञान : अॅनिमेशनसाठी सॉप्टवेअरची माहिती असणे ही सर्वात महत्वाची अट आहे. यासाठीचं तुम्हाला यामध्ये Maya, Blender, ZBrush आणि Adobe Animate सारख्या महत्वपूर्ण सॉप्टवेअरची माहिती होईल.

स्पेशलायझेशन कॅटेगरी

– व्हिज्युअल इफेक्ट (VFX) : तुम्हाला व्हिज्युअल इफेक्ट तयार करायला जास्त आवडत असतील तर ही कॅटेगरी तुमच्यासाठी आहे. यामध्ये विविध चित्रपट, टीव्ही शो आणि व्हिडीओ गेम सारख्या गोष्टींमध्ये व्हिज्युअल इफेक्ट देण्याचे तंत्र शिकले जातात.
– 2D अॅनिमेशन – यामध्ये कॅरेक्टर रिगिंग, लिप-सिंकिंग आणि स्पेशल इफेक्ट्सबद्दल शिकवले जाईल. त्यासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे हाताने काढलेले अॅनिमेशन, वेक्टर अॅनिमेशन आणि स्टॉप-मोशन अॅनिमेशनसह 2D अॅनिमेश तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्व कौशल्य शिकवण्याचा समावेश या स्पेशलायझेशन कोर्समध्ये आहे.
– 3D अॅनिमेशन – या स्पेशलायझेशनमध्ये 3D अॅनिमेशमची संपूर्ण माहिती, टेक्सचर आणि अॅनिमेट कसे करायचे हे शिकवले जाते. विशेष करून रेंडरिंग, लाइटिंग आणि डायमॅमिक्स या घटकांबद्दल तुम्हाला शिकवले जाते.

2) Animation Courses After 12th

तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि अॅनिमेशमध्ये करिअर घडविण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला अॅनिमेशन बद्दल काहीही माहित नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मागील काही वर्षांमध्ये अॅनिमेशन हा उद्योग जगातील वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नवनवीन गोष्टी क्रिएट करण्याची क्षमता असाणाऱ्या या कोर्सकडे तरुण मुले मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. त्यामुळे 12वी नंतर हा एक उत्तम करिअर पर्याय ठरू शकतो.

पात्रता निकष

विद्यार्थी Bachelor Of Design in Animation (B.Dec) करण्यास इच्छूक असेल तर संबंधित विद्यार्थी बारावी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. तसेच विद्यार्थ्याकडे क्रिएटिव्ह अऍप्टिट्यूड कौशल्ये असणे आवश्यक आहे.

अॅनिमेशमध्ये डिप्लोमा करू इच्छिनाऱ्या विद्यार्थी केवळ 12 वी उत्तीर्ण असला पाहिजे. पण काही संस्थांमध्ये 50 टक्के गुणांनी 12वी उत्तीर्ण ही पात्रता निकष असू शकते.

अॅनिमेशमध्ये सर्टिफिकेट कोर्स करू इच्छिनाऱ्या विद्यार्थ्याने 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही सर्टिफिकेट कोर्स हे विद्यार्थी 10 वी उत्तीर्ण झाल्यावर सुद्धा करू शकतात.

विद्यार्थ्यांच्या आवडीचे आणि लोकप्रिय अॅनिमेशन कोर्सेस

Bachelor Of Science (B.SC)

B.Sc.in Animation And Film Making
B.Sc.in VFX Film Making
B.Sc.in Multimedia, Animation And Graphics
B.Sc.in 3D Animation Film Making
B.Sc.in Graphic Design

Diploma And Other Course
Diploma in Animation and VFX
BVA in Animation And Multimedia

Bachelor OF Designation (B.Des)
B.Des. in Communication Design
B.Des. in Animation And VFX

कोर्सेस बद्दल माहिती मिळाल्यानंतर पूढचा टप्पा सुरू होतो तो प्रवेश प्रक्रियेचा. प्रत्येक कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल आहेत. त्यची माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत.

B.Sc, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया

तुम्हाला जर अॅनिमेशनमध्ये डिप्लोमा किंवा B.Sc करायची असेल तर तुम्ही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्ही केवळ 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

Bachelor of Visual Arts (BVA) प्रवेश प्रक्रिया

BVA ला प्रवेश घेण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे संबंधित विद्यार्थी 12वी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच काही संस्थांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रवेश दिला जातो.

Bachelor Of Designation (B.Des) प्रवेश प्रक्रिया

जे विद्यार्थी B.Des ला प्रवेश घेण्यास इच्छूक असतील अशा विद्यार्थ्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे 12 वी उत्तीर्ण असले पाहिजे. या अभ्यासक्रमासाठी विशेषत:प्रवेश परिक्षा घेतली जाते. विद्यार्थ्याला त्या प्रवेश परिक्षेला बसणे अनिवार्य असते. परिक्षेला मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. तसेच बऱ्याच शैक्षणिक संस्था या फक्त प्रवेश परिक्षा न घेता सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

Top Colleges to study Animation After 12th

1. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, नवी मुंबई
2. संस्कार अॅकेडमी, पुणे
3. एमआयटी (MIT) इन्स्टिय्टूट ऑफ डिझाईन, एमआयटी कला, डिझाइन आणि तंत्रत्रान विद्यापीठ, पुणे
4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, सिम्बायोसिस इंटरनॅशनल, पुणे आणि मुंबई
5. अरेना अॅनिमेशन, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि नोएडा
6. आर्टेमिसिया कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, इंदूर
7. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU), जालंधर
8. बंगलोर विद्यापीठ, म्हैसूर रोड, बंगलोर
9. मौलाना अबुल कलाम आझात तंत्रज्ञान विद्यापीठ (MAKAUT), कोलकोटा
10. ZICA संस्था, इंदूर

3) Diploma In Animation

इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणकोणते कोर्सेस विद्यार्थी करू शकतात याची माहिती आपण पाहिली. बरेच विद्यार्थी डिप्लोमा करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळेच अॅनिमेशनमध्ये डिप्लोमा हा अॅनिमेशन क्षेत्रातील सर्वाधिक मागणी असलेला आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा कोर्स आहे. अॅनिमेशमध्ये डिप्लोमा यशस्विरीत्या पूर्ण केल्यानंतर विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते. जसे की, गेमिंग सोल्यूशन, 2D/3D अॅनिमेटेड चित्रपट आणि कार्टून चित्रपट डिझाइन करणाऱ्या कंपन्या अशा उमेदवारांच्या शोधात असतात.

पात्रता

अॅनिमेशन डिप्लोमा करण्यासाठी 10 वी नंतर कशापद्धतीने प्रवेश घेता येईल याची माहिती वरती देण्यात आली आहे. 12 वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने 12 वी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असण गरजेचं आहे. तर काही महाविद्यालयांमध्ये गुणांची अट नसते तुम्ही फक्त 12वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच बहुतेक प्रसिद्ध महाविद्यालयांमद्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षा घेतली जाते. प्रवेश परिक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे प्रामुख्याने अॅप्टिट्यूड, रिझनिंग आणि लॉजिकल डिडक्शन, जनरल नॉलेज, चालू घडामोडी आणि इंग्रजी व्याकरण या विषयांचा समावेश असतो.

अभ्यासक्रम

अॅनिमेशनध्ये डिप्लोमा करण्यासाठी तीन सेमिस्टर या एका वर्षामध्ये घेतल्या जातात. संपूर्ण कोर्स हा एक वर्षाचा असतो.

अॅनिमेशनध्ये डिप्लोमा करण्यासाठी सरकारी तसेच खासगी महाविद्याले

भारतातील सरकारी महाविद्यालये

1. यशवंतराव चव्हण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
2. आयआयटी बॉम्बे
3. छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर
4. इंदीरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली
5. बंगलोर विद्यापीठ
6. गुजरात विद्यापीठ
7. जामिया मिलिया इस्लामिया दिल्ली
8. नॅशनल इन्स्टिट्यूय ऑफ डिझाईन, अहमदाबाद
9. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉडी, दिल्ली
10. मद्रास विद्यापीठ, चेन्नई

भारतातील खासगी महाविद्यालये

1. छत्रपीत शिवाजी महाराज विद्यापीठ, मुंबई
2. इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाईन, पुणे
3. पिकासो अॅनिमेशन कॉलेज, दिल्ली
4. अरेना क्रिएटिव्ह कॅम्पस, जयनगर
5. वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन, सोनीपत
6. वोग इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड अॅनिमेशन, बंगलोर
7. सिस्टर निवेदिता विद्यापीठ, कोलकाता
8. सीमेडू स्कूल ऑफ प्रो-एक्सप्रेशन
9. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अँड अॅनिमेशन, बंगलोर
10. आर्टेमिसिया कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन

4) BSc In Animation And VFX

दहावी बारावी पूर्ण केल्यावर अॅनिमेशमनध्ये करिअर करण्यासाठी कोणते कोणते निकष पूर्ण केले पाहिजेत याची तपशीलवार माहिती तुम्हाला मिळाली आहे. आता आपण अॅनिमेशनमध्ये बी.एस.सी करण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष पूर्ण करावे लागतील याची माहिती या भागामध्ये तुम्हाला होईल. 12 वी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होतात. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.

बीएससी अॅनिमेशन हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तीन वर्षांमध्ये सहा सत्र घेतली जातात. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कंप्युटर अॅनिमेशन, फिल्म मेकिंग आणि फ्लॅश, फोटोशॉप, अॅडोब आफ्टर इफेक्ट्स, अॅडोब प्रीमियर, ऑटोडेस्क अशा विविध सॉफ्टवेअर प्रोग्राम्सचे प्रशिक्षण दिले जाते.

BSc Animation Eligibility Criteria

पात्रता निकष हे प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळे असू शकतात.
विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अॅनिमेशनमध्ये बीएससी करण्यासाठी पात्र असणार आहेत. काही कॉलेजेमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी पात्रता निकष असतात उदा. बारावी किमान 50 टक्के गुणांना उत्तीर्ण केलेली असावी. त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या कॉलेजची अधिकृत वेबसाईट विद्यार्थ्यांनी पहावी.

BSc Animation Entrance Exam

काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश परिक्षा घेतली जाते. या प्रवेश परिक्षेमध्ये प्रामुख्याने मीडिया अॅप्टीट्यूड, रिझनिंग, लॉजिकल डिडक्शन, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि इंग्रजी भाषा या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. भारतामध्ये अॅनिमेशनसाठी पुढील प्रवेश प्रक्रिया घेतल्या जातात जसे की, JMI Entrance Exam, CUCET आणि SHIATS.

Top Government Colleges for BSC in Animation

• Savitribai Phule Pune University, Pune
• MAKAUT, Kolkata
• MCNUJC, Bhopal
• Gurugram University, Gurgaon
• Institute of Mass Communication And Media Technology, Kurukshetra University
• J.C.Bose University Of Science And Technology, YMCA, Faridabad
• MCNUJC, Bhopal
• School Of Distance Education, Bharathiar University
• Thiruvalluvar University
• Gujarat University, Ahmedabad

Top Private Colleges For BSc in Animation

• Jaywant Shikshan Prasarak Mandal (JSPM) University, pune
• Chandigarh University, Chandigarh
• Institute Of Management Study, Kolkata
• Manipal Institute Of Communication
• NSHM Design School Kolkata
• Picasso Animation College, Delhi
• Vogue Institute Of Art And Design, Bangalore
• Chandigarh Group Of Colleges, Chandigarh
• Brainware University Kolkata
• CGC Landran, Chandigarh

BSc Animation Job Profiles And Salary

अॅनिमेशनमध्ये बी.एस.सी उत्तीर्ण केल्यानंतर जॉब आणि चांगला पगार या दोन गोष्टींसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. त्यामुळे काही महत्वपूर्ण नोकरीच्या पर्यायांची यादी खाली देण्यात आली आहे.

• Animator या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 3.5 लाख प्रति वर्ष पगार मिळू शकतो.
• Flash Animator या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 3.8 लाख प्रति वर्ष पगाम मिळू शकतो.
• Stop Motion Animator या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3.5 ते 4 लाख प्रति वर्ष पगार मिळू शकतो.
• Video Game Designers या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 ते 4.5 लाख प्रति वर्ष पगार मिळू शकतो.
• Animator Director या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4.5 ते 4.9 लाख प्रति वर्ष पगार मिळू शकतो.
• Background Painter या पदावर काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 3.8 लाख प्रति वर्ष पगार मिळू शकतो.

BSc Animation Top Recruiters

चांगला पगार आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. त्याच पद्धतिने चांगल्या कंपनीची सुद्धा सर्वात जास्त आवश्यकता असते. आपल्या करिअरला आकार देण्यासाठी पुढे काही कंपन्यांची यादी देण्यात आली आहे.

फ्रेशर्सला संधी देणाऱ्या Top 10 Animation Companies

• Acer
• Amazon Global Vision
• Disney
• Adobe Systems Pvt.Ltd
• UTV Toonz
• Reliance Media Works Ltd.
• Maya Entertainment
• Google Inc
• Pent Media Graphics
• Google Vision

1 thought on “Animation; करिअरचा एक उत्तम पर्याय”

Leave a comment