मुंबई महानगरपालिकेत (BMC Recruitment 2025) विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. संबंधित पदांवर काम करणाऱ्यांना 20 ते 60 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. त्यामुळे BMC मध्ये काम करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी ही सूवर्णसंधी आहे.
कोणकोणती पदे भरली जाणार
BMC च्या या भरतीअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैद्यकीय कोडर आणि हेल्थ डेटा मॅनजेर याची एकूण 12 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये पदांची विभागणी मेडिकल कोडरसाठी 6 जागा, हेल्थ डेटा मॅनजर साठी 3 जागा आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी 3 जागा असणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी संबंधित उमेदवाराने 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी आणि कोणत्याही शाखेतून त्याने पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इंग्रजी 40 गुणांसह आणि मराठी टायपिंक 30 गुणांसह उमेदवाराकडे DOEACC सोसायटीचे ‘CCC’ किंवा ‘0/A/B/C लेव्हल प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र असले पाहिजे. किंवा जर सदर प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळवायची असल्यास सरकारने वेळोवेळी मान्यता दिलेला संगणक वापराचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
मेडिकल कोडर पदासाठी संबंधित उमेदवाराने 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच बी.एससी. बायोलॉजिकल सायन्स/लाईफ सायन्स?व्हीएससी (व्हायोलॉजी) – किमान 55 टक्के गुण + अनुभवासह उत्तीर्ण असने अवाश्यक आहे.
आरोग्य डेटा व्यवस्थापक पदासाठी संबंधित उमेदवाराने 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच आरोग्य माहितीशास्त्र किंवा बायोस्टॅटिस्टिक्समध्ये MSc किंवा बायोमेडिकल अभियांत्रिकीमध्ये बीई/बी.टेक + अनुभव असावा.
वयोमर्यादा आणि वेतन किती मिळणार
तीन्ही पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष दरम्यान आहे. तसेच मेडिकल कोडर पदावर काम करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 29,700 रू, आरोग्य डेटा व्यवस्थापक पदावर काम करणाऱ्या उमेदवाराला 60,000 रू आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरला दरमहा 20,000 रू. पगार मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2025 आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/
(सोर्स – महाSarkar)