Tennis Cricket News – जन्नी कुंभळजाई चषक 2026 दिमाखात; वयगांव 11 चा विजयी जल्लोष, बोरगाव बुद्रुक उपविजेता

जगदंब स्पोर्ट्स, जोर आणि ग्रामस्थ मंडळ जोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जन्नी कुंभळजाई चषक जोर-२०२६ ही भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा (Tennis Cricket News) नवी मुंबईतील घणसोली येथे उत्साह, जल्लोष आणि क्रीडामय वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या निमित्ताने जोर परिसरातील तसेच बाहेरील अनेक संघ एकत्र आले आणि प्रेक्षकांना थरारक सामने पाहायला मिळाले.

अंतिम सामन्यात उत्कृष्ट संघभावना, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्दीच्या जोरावर वयगांव ११ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यांच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे बोरगाव बुद्रुक संघानेही शेवटपर्यंत झुंजार लढत देत प्रेक्षकांची मने जिंकली आणि उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये खेळाडूंनी आपली चमक दाखवली. भक्कम आणि विश्वासार्ह फलंदाजी करत राहुल वाडकर याने सर्वोत्कृष्ट फलंदाज (Best Batsman) पुरस्कार पटकावला. तर अचूक मारा आणि निर्णायक बळी घेत रोहन वाडकर याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler) म्हणून गौरविण्यात आले.

संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत अमित वाडकर (CKM बोरगाव) याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्याने दमदार १०४ धावा करताना ४ विकेट घेत मालिकावीर हा मानाचा किताब पटकावला. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन, मैदानावरील व्यवस्था आणि खेळाडूंना दिलेला उत्साह पाहता आयोजक जगदंब स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ जोर यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!