मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court Recruitment) नोकरी करण्यासाठी धडपड करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. मुंबई उच्च न्यायालयात पर्सनल असिस्टंट (PA) पदासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना जवळपास 67,700 ते 2,08,700 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. त्यामुळे एक चांगल करिअर घडवण्याची संधी उमेदवारांना आहे. परंतु यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? वयोमर्यादा काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? अर्ज करायचा कुठे? पर्सनल असिस्टंटच्या कामाचे स्वरूप कसे असते? या सर्व घटकांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
पर्सनल असिस्टंट पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
- PA होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे.
- PA होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला उच्च न्यायालयात 8 ते 10 वर्ष काम करण्याचा अनुभव असावा.
- PA होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे जर कायद्याची पदवी (Law) असेल तर, अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल
पर्सनल असिस्टंट पदासाठी इतर महत्त्वपूर्ण प्रक्रिया
- उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे.
- आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सुट देण्यात येईल
- उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल.
- या पदासाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आकारले जाईल.
- या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 67,700 ते 2,08,700 रुपये पगार दिला जाईल.
पर्सनल असिस्टंटच्या कामाचे स्वरूप कसे असते?
न्यायाधीशांना मदत करणे
- कोर्टात बसून न्यायाधीश जे सांगतात त्याचे जलदगतीने शॉर्टहँडमध्ये नोट्स घेणे.
- त्या नोट्सचे अचूक टायपिंग करून संगणकावर टाइप करणे.
दस्तऐवजांची तयारी
- आदेश (Orders), निर्णय (Judgments) आणि नोट्स यांचे मसुदे तयार करणे.
- अधिकृत पत्रव्यवहार व कोर्टाशी संबंधित कागदपत्रांची योग्य प्रकारे नोंद ठेवणे.
गोपनीयता राखणे
न्यायालयीन कामकाजातील माहिती ही संवेदनशील असते, त्यामुळे गोपनीयतेचे पालन करणे महत्त्वाचे.
वेळेचे व्यवस्थापन
न्यायाधीशांच्या दैनंदिन कोर्ट शेड्यूल, मीटिंग्स व दस्तऐवजांचे व्यवस्थापन.
आवश्यक कौशल्ये
- इंग्रजी टायपिंग व शॉर्टहँडमध्ये गती.
- कायदेशीर शब्दसंग्रहाचे ज्ञान.
- संगणकावर (MS Word, कोर्ट सॉफ्टवेअर) काम करण्याची सवय.
- शिस्त, अचूकता आणि गोपनीयता पाळण्याची सवय.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
“ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. अधिकृत तपशील व अर्जासाठी कृपया संबंधित सरकारी संकेतस्थळाला भेट द्या.”