BSF Job Alert – बीएसएफमध्ये भरती, अर्ज प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या पात्रता, वयाची अट आणि शेवटची तारीख

देशसेवच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. गणेशोत्सवाला दोन दिवसांनी सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच बॉर्डरस सिक्युरिटी फोर्सने (BSF Job Alert ) उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे. BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी काही अटींची पूर्तता उमेदवारांना करावी लागणार आहे.

पात्रता

  • 60 टक्के गुणांसह उमेदवाराने 12वी उत्तीर्ण केलेली असावी
  • 12 वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असावा

किंवा

  • उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण करून दोन वर्षांची आयटीआय पदवी मिळवलेली असावी
  • आयटीआय पदवीमध्ये रेडियो, टेलिव्हिज, इलेक्ट्रॉनिक्स, सीओपीए, जनरल इलेक्टॉनिक्स , डेटा एंट्री ऑपरेटर या पदव्यांचा समावेश आहे.

वयोमर्यादा किती आहे

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय हे 17 ते 25 वर्ष असावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 

23 सप्टेंबर 2025

अर्ज कुठे करायचा

अर्ज करण्यासाठी rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.