Jawlya fort- दिलेरखानाला मराठ्यांनी झुंजवलं होतं, वाचा जावळ्या गडावरचा थरार…

चंदन-वंदन या जुळ्या गडांची माहिती तुम्ही वाचली असेलच. साताऱ्यातील जुळी भावंड म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. याव्यतिरिक्त अनेक जुळे गड महाराष्ट्राच्या मातीत आहेत. याच जुळ्या गडांमधला गड म्हणडे रवळ्या आणि Jawlya fort. नाशिक जिल्ह्यात सातमाळा रांगेत या गडांचे वास्तव्य आहे. जावळ्या गड रवळ्या गडाच्या तुलनेच चढण्यास सोपा आहे. मात्र मुक्काम केल्यास रवळ्या आणि जावळ्या हे … Read more

Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून … Read more

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेल्या काही मोजक्या गडांमध्ये Torna Fort चा उल्लेख आवर्जून केला जातो. गरूडाच घरटं या नावाने सुद्धा हा गड ओळखला जातो. अतिदुर्गम व अतिविशाल असलेला तोरणा दुर्गवेड्यांच्या आवडीचा गड. गडाची चढण कितीही कठीण असली तरी, आजही मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी तोरणा गडाला आवर्जून भेट देतात. घनदाट जंगलांनी वेढलेला हा गड सह्याद्रीच्या रांगेतील एका … Read more

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती

मागच्या वर्षी जुलै महिन्यात (2023) दु:खद घटना घडली आणि पाहता पाहता इर्शाळगडावर (Irshalgad Fort) असणारी इर्शाळवाडी दरड कोसळल्याने नेस्तनाबूत झाली. 70 हून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला, तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. जुलै महिन्यात या भयंकर दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे सर्वप्रथन या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. रायगड जिल्ह्यात माथेरानच्या डोंगररागांमध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये … Read more

Daulatabad Fort – भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली चमत्कार, देवांचा किल्ला

महाराष्ट्रातील शंकूच्या आकाराच्या टेकडीवर वसलेला, Daulatabad Fort हा भारताच्या समृद्ध स्थापत्य आणि लष्करी वारशाचा दाखला आहे. “अभेद्य किल्ला” किंवा “देवांचा किल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दौलताबादने शतकानुशतके इतिहासकार, प्रवासी आणि वास्तुविशारदांना मोहित केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वायव्येस अंदाजे 16 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भव्यता, महत्त्वाकांक्षा आणि लवचिकतेची कथा सांगतो. दौलताबाद किल्ला त्याच्या अद्वितीय रचना आणि … Read more

Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड

सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा … Read more

Durga Khote – मराठी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर नावं, पतीचे निधन अन् दुर्गा खोटे यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल

धैर्य, प्रतिभा, चिकाटी आणि भारताच्या चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक नावं म्हणजे Durga Khote होय. दुर्गा खोटे यांचा जन्म झाला तो काळ महिलांसाठी अतिशय खडतर होता. महिलांना फक्त चुल आणि मुल या दोनच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. महिलांच्या पायात एकप्रकारे बेडी बांधली गेली होती. या काळात दुर्गा खोटे यांनी अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आणि इतिहास घडला. भारतीय … Read more

John Cena – 90 च दशक गाजवणारा WWE Champion, समाजकार्यातही पाडलीये विशेष छाप; वाचा सविस्तर…

John Cena म्हणजे 90 च्या दशकातील लाखो तरूणांच्या गळ्यातील ताईत. WWE पाहण्याच सर्वात मोठं कारण म्हणजे जॉन सीनाची मॅच. मीही त्याचाच एक चाहता. त्यामुळे त्याच्या जीवन प्रवास जाणून घेण्याची खूप उत्कंठा होती. व्यवसायिक रेसलर ते क्रीडा मनोरंजन आणि हॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता बनण्यापर्यंतचा जॉन सीनाचा प्रवास कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि तितकाच प्रेरणादायी आहे. या ब्लॉगच्या … Read more

Pratiksha Bagdi – पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, सांगलीच्या लेकीची धडाकेबाज कामगिरी

महाराष्ट्र केसरी म्हटल की एखादा धिप्पाड तरुण तुमच्या डोळ्या समोर आला असेल. लाल मातीत रंगणाऱ्या कुस्तीवर पुरुषांच आजही अधिराज्य आहे, अस म्हटल तर चुकीचं ठरणार नाही. खाशाबा जाधव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौघुले, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक शेख, नरसिंग यादव, सिकंदर शेख इ. ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध कुस्तीपटुंची नावं. महाराष्ट्रातील कुस्ती न पाहणाऱ्या … Read more

Visapur Fort – दुर्गप्रेमींच्या आवडीचा लोणावळ्याच्या कुशीत वसलेला विसापूर, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली … Read more