Ganeshotsav 2025 – प्रभू श्री राम ते आदमापूरातले बाळूमामा, कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; पाहा एका क्लिकवर

गणेशोत्सवाला आता अवघे 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे रविवारी (17 ऑगस्ट 2025) मुंबईतील लालबाग, परळ आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गणरायांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्य, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा ओसंडून वाहणाऱ्या जल्लोषाने सर्व परिसर दणाणून गेला होता. जवळपास 60 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सवात भक्तांना … Read more

Ganeshotsav 2025 – महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज, पाहा कोणकोणत्या गणरायांच झालं आगमन; मुंबईचा गजमुखंम पाहिलात का?

महाराष्ट्र गणरायाच्या (Ganeshotsav 2025) आगमनसाठी सज्ज झाला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी आणि मंडळांमध्ये विराजमान होईल. मात्र, मुंबईमध्ये गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यातला प्रत्येक रविवार गणेशभक्तांसाठी खास ठरणार आहे. दर रविवारी विविध मंडळांचे गणराया मंडपाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. याची सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट 2025 रोजी परळच्या महाराजा, … Read more

Shrawan Somvar – श्रावणसरी आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला विसापूरचा महादेव

Shrawan Somvar मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर … Read more

Wai – श्रावण महिना आणि निसर्ग सौंदर्याने उजळून निघालेला वाई तालुक्याचा पश्चिम भाग

श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीने जणू हिराव शालू पांघरून घेतल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी नेहमची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या Wai तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने नटलेल्या देवघराचे रूप येते. धुक्यात हरवलेली डोंगररांग, कमळगड किल्ला, धोम आणि बलकवडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, खळखळ वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणार असतं. त्यामुळे आपसूक पर्यटकांची पावलं महाबळेश्वर, पाचगणीसह … Read more

Rice Plantation – वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणीची लगबग, पहा Photo

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात (Rice Plantation) लावणीच्या कामांना वेग आला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे. गाणी म्हणत, एकमेकांना मदत करत, शेताच्या बांधावर जेवण करत महिला, पुरुष आणि मुलं सुद्धा भात लावणीच्या कामात कुटुंबातील सदस्यांना मदत करता आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम … Read more

Wai News – वयगांवमध्ये शेताच्या बांधावर भरली अनोखी शाळा, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतला भात लावणीचा आनंद

Wai News पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली की, ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. गावाकडची मुलं अगदी उत्साहात शेतीच्या कामांमध्ये आई-वडिलांना मदत करत असतात. पंरतु शहरी भागातील मुलांना शेतीच्या कामांबद्दल अगदीच तुरळक माहिती असते किंवा काहीच माहिती नसते. त्यामुळे शहरातील मुलांना प्रत्यक्ष शेतात काम करण्याचा अनुभव घेता येत नाही. पण जेव्हा शाळा किंवा महाविद्यालये … Read more

Pandharpur Wari 2025 – देहभाव हरपला | तुज पाहतां विठ्ठला…, हरिनामाच्या गजरात पंढरपूर झाले तल्लीन

Pandharpur Wari 2025 रुपी जडले लोचन | पायी स्थिरावले मन || देहभाव हरपला | तुज पाहतां विठ्ठला || कळो नये सुखदुःख | तहान हरपली भूक || तुका म्हणे नव्हे परती | तुझ्या दर्शन मागुती ||   संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ म्हणजे, माझे डोळे तुमच्या रुपाच्या ठिकाणी गढून गेले आहेत. तुमच्या चरणी माझे मन स्थिरावले … Read more

Pandharpur Wari 2025 – गजर हरिनामाचा! श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाची एकदिवसीय पायवारी

श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एकदिवसीय पायवारीचे आयोजन करण्यात आलं होतं. दैनंदिन कामाच्या व्यापातून उसंत घेत एक दिवस सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने वारकरी पुणे ते सासवड पायवारीमध्ये सहभागी झाले.  लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या एकदिवसीय पायवारीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून आलेल्या दिंडी क्रमांक 31 मध्ये … Read more