Chia Seeds Benefits For Skin – आता तुमचीही त्वचा चमकदार होणार! जाणून घ्या कशी

सौंदर्य आणि तुळतुळीत त्वचा म्हंटल की आपसुकच कोरिअन किंवा परदेशी महिलांची आठवण होते. जणू काही त्यांनी काचेसारख्या चमकदार त्वचेचे वरदानच आहे. कोरिअन महिला त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. चमकदार त्वचेसाठी सर्वात महत्तावाची गोष्ट म्हणजे चिया सीड्स (Chia Seeds Benefits For Skin). आपण सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक रील्स पाहिल्या असतील. चला तर मग जाणून घेऊया कसा करायचा मोस्ट व्हायरल चिया सिड्सचा वापर

चिया सिड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि झिंक सारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक त्वचेत सुधारणा आणतात आणि तिला आतून पोषण देण्याचे काम करतात. विशेषतः अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात आणि ती निरोगी आणि चमकदार बनवतात.

चिया सिड्स त्वचेवर कसा परिणाम करतात?

  • डाग कमी करतात: चिया सिड्स त्वचेच्या आतील थरांपर्यंत पोहोचून काळे डाग कमी करण्यास मदत करतात.
  • त्वचेला ओलावा प्रदान करते: चिया सिड्स त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतात, ज्यामुळे कोरडेपणा आणि पिगमेंटेशनची समस्या दूर होते.
  • नवीन पेशींची निर्मिती: चिया सिड्समध्ये असलेले प्रथिने नवीन त्वचेच्या पेशी तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे डाग हळूहळू कमी होऊ लागतात.

चिया बियाणे कसे वापरावे

चिया सिड्सचा फेसमास्क बनवण्यासाठी आधी तुम्हाला ते किमान २ तास भिजत ठेवावे लागतील. यानंतर त्यामध्ये एक चमचा कोरफडीचे जेल आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळावा लागेल. यानंतर हे मिश्रण एकत्र करून ते किमान २० मिनीटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

(टीप – कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांना सल्ला आवर्जून घ्या. हा फक्त एक माहितीपर लेख आहे)

How To Gain Weight in Marathi – लुकड्या लुकड्या… लोक चिढवतायत; वजन वाढवण्यासाठी या 10 टिप्स फॉलो कराच