दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (D B Patil International Airport Navi Mumbai) आज (08-10-2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासह गोंधळ, दहीहंडी, लावणी, आदिवासी नृत्यू आणि आगरी-कोळी नृत्य सुमारे 60 कलाकार सादर करणार आहेत. जवळपास 50 हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था या रंगारंग सोहळ्यासाठी करण्यात आली आहे.
लंडनमधील हीथ्रो विमानतळाच्या धर्तीवर या विमानतळाची रचना करण्यात आली आहे.
या विमानतळावर चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या असणार आहेत.
यापैकी पहिल्या टर्मिनलचे आणि एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे.
चारही टप्प्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक क्षमता जवळपास नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची होणार आहे.
उलवे परिसरातील 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रावर विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साधारण तीनच्या सुमारास उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.