महाराष्ट्रात यंदाचा गणेशोत्सवसाठी (Ganeshotsav 2025) राज्य शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून मोठ्या थाटमाटात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक गणेशोत्सव मंडळे विविध देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी नागरिक सुद्धा मोठी गर्दी करतात. आता राज्य सरकारने सुद्धा याची दखल घेतली असून यासाठी ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेसोत्सव मंडळ स्पर्धा 2025’ चे आयोजन केलं आहे. यासाठी अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2055’ साठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस मंगळवार (26 ऑगस्ट 2025) असणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवसांत जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर अर्जाची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने याची माहिती दिली आहे.
Ganeshotsav – भजनी मंडळांचा गणेशोत्सव दणक्यात होणार! राज्य सरकार देणार 25 हजार रुपये अनुदान, वाचा…