मित्र म्हटलं की आपल्या हक्काचा माणूस. त्यामुळे मजाक मस्ती या सर्व गोष्टी आल्याच. परंतु बऱ्याच वेळा मजाक मजाकमध्ये समोरच्या व्यक्तीला मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. एक दोन वेळा या गोष्टी एखादी व्यक्ती सहन करतेही. परंतु एका विशिष्ट वेळेनंतर याच रुपांतर थेट हाणामारीत होतं. यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता निर्माण होते. तुमच्याबाबतही असा प्रसंग घडत असेल किंवा एखादी व्यक्ती तुमची बदनामी (Defamation Law ) करत असेल तर, तो कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू शकता. भारतात मानहानीसंबंधी कायदे भारतीय दंड संहिता (Indian Penal Code – IPC) मध्ये नमूद आहेत.
कायद्यानुसार बदनामी म्हणजे काय?
IPC कलम 499 – बदनामी म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल खोटे किंवा बदनामीकारक विधान करणे, ज्यामुळे संंबंधित व्यक्तिची प्रतिमा इतरांच्या नजरेत खराब होते.
काय शिक्षा होऊ शकते?
IPC कलम 500 – जर बदनामी सिद्ध झाली, तर खालील शिक्षा होऊ शकते:
- जास्तीत जास्त 2 वर्षांची कारावास
- दंड, किंवा
- दोन्ही
बदनामीची उदाहरणे
- मित्राबद्दल खोटी अफवा पसरवणे (उदा: चोरी केली, अपात्र आहे, वाईट सवयी आहेत वगैरे).
- सोशल मीडियावर खोटे/अपमानास्पद पोस्ट करणे.
- सार्वजनिक ठिकाणी अपमानजनक भाषण देणे.
जर कोणी तुमची बदनामी करत असेल तर?
- पुरावे जमा करा (screenshot, व्हिडीओ, ऑडिओ, संदेश इ.)
- पोलिसात तक्रार द्या – कलम 499 आणि 500 अंतर्गत
- मानहानीचा दावा सिव्हिल कोर्टात करू शकता – नुकसानभरपाईसाठी
लक्षात ठेवा
- खरे बोलणे हे सत्यता पुराव्याच्या आधारावर योग्य ठरते.
- पण कोणाचाही अपमान करणे, त्याला त्रास देणे उद्देशाने काही बोलणे किंवा लिहिणे हा गुन्हा ठरतो.
- विनोद, टीका आणि बदनामी यामध्ये सूक्ष्म फरक असतो.