मुंबईची जीवनवाहिनी जशी मुंबईची लोकल आहे, तसंच मुंबईच्या खवय्यांची गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच पहिली पसंती म्हणजे वडापाव. मुंबईच्या या वडापावची संपूर्ण जगभरात ख्याती आहे. पण बऱ्याचदा लोक वडापाव (Diet And Vada Pav) खाण टाळतात. खासकरून हेल्दी डायट करणारे बाहेरचे पदार्थ खात नाही. कारण वडापाव म्हणजे तेलकट तळलेला असतो. त्यामुळे तो आरोग्यासाठी अपायकारक मानला जातो. मात्र जर तुम्हाला डायट बॅलेन्स करण्यासाठी Cheat Meal म्हणून एखादा वडापाव खा असं सांगितलं तर?
एका वडा-पावमध्ये साधारणतः 250-350 कॅलोरी असते. त्यामुळे जर तुमचं दिवसभरातील कॅलेरिचं सेवन योग्य आणि तुमच्या नियमात बसणारं असेल, तर तुम्ही वडापावच सेवन करू शकता. खर तर वडापावमध्ये बटाटा, बेसन आणि पाव असतो. जर हे पदार्थ तुम्ही अगदी संतुलित प्रमाणत खाल्ले तर त्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. यासाठी तुम्ही वडा तळून नाही तर बेक करून खाऊ शकता.
बेक केलेला वडा खाला तर तेलाचा वापर कमी होतो. कमी तेलाचा वडा, गव्हाचा पाव आणि त्यावर हिरवी आणि लसणाची चटणी.. आहा! असा वडापाव जर तुम्ही खाल्लात तर तुमच्या डायटवर कसलाही परिणाम होणार नाही. एखादा वडा-पाव खाल्ला म्हणून डायट बिघडत नाही, पण त्याची वारंवारता, वेळ आणि प्रमाण याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
जर तुम्हाला वडापाव खायचा असेल तर तुम्हाला दिवसभर थोडं कॅलरी नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही हा वडापाव घरीच बनवून खाल्ला तर अती उत्तम. कारण यामध्ये तुम्हाला बटाट्यासोबत पालेभाजी किंवा इतर डाळींचा समावेश करता येईल तसेच वड्यासाठी शेंगदाण्याचे तेल, गव्हाचा पाव वापरला तर उत्तमच.
(वरील टीप्स करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक)