छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला आणि स्वराज्य स्थापनेचा पहिला मानकरी ठरला तो तोरणा (Torna Fort). इ.स 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्यात सामीला केला आणि स्वराज्याच्या मोहिमेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा झाला. हा गड स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडाचे नाव तोरणा असे पडले.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरेवाडी गावच्या शिवगणेश मंडळातील मुलांनी एकत्र येत तोरणा गडाची सुंदर प्रतिकृती उभी केली आहे. आर्यन मोरे, वेदांत मोरे, किशोर मोरे, सुरज मोरे, स्वराज मोरे, दर्शन मोरे, ओमकार मोरे, शौर्या मोरे, विहान मोरे, शर्वील मोरे, अबोली मोरे आणि आर्या मोरे या सर्व मुलांनी तोरणा किल्ला उभा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि गड उभा केला.
- तोरणा समुद्रसपाटीपासून साधारण 4 हजार 600 फूट उंचीवर आहे.
- तोरणावर झुंजार, बुधला, विशाळा या काही प्रमुख्य माच्या आहेत.
- गडाचे संरक्षणाच्या दृष्टीने फुटका, भेल, साफेली, मालेचा, हनुमान असे अनेक बुरूज गडावर आहेत.
- गडावग तोरणजाई देवीचे, मेंगाई देवीचे मंदिर आहे.
गडाच्या सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिका करा –
Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाचं घरटं, स्वराज्याचे तोरण