भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च प्रगती केली. वाचाल तर वाचाल… हा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्वांनाच दिला. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून भारताच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुवर्णअक्षरांनी लिहिण्यात आलं आहे. बाबासाहेबांना शिक्षण घेत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला होता. उच्च शिक्षण घेताना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा गरजवंत विद्यार्थ्यांसाठी Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ आता तालुकास्तरावरही घेता येणार आहे.
काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना?
डॉ.बाबासाहेब स्वाधार योजना ही उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी योजना आहे. ही योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि उत्पन्नाची अट काय आहे?
- जे विद्यार्थी अकरावी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी ज्या शहरात किंवा तालुक्यात शिक्षण घेत आहे, त्या शहरातील किंवा तालुक्यातील वसतिगृहात त्याला प्रवेश मिळालेला नसावा.
- वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणचे निवासस्थान व कॉलेजमधील अंतर किमान 5 किलोमीटर इतके असावे.
योजनेचे इतर नियम काय आहेत?
- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्या विद्यार्थ्यांना निवासासाठी, जेवणासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते.
- भोजन आणि निवास भत्त्यांव्यितिरिक्त प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्यासाठी दोन हजार ते पाच हजार रुपये देण्यात येतात.
योजेनसाठी जे विद्यार्थी पात्र होतील, त्यांना किती भत्ता मिळणार?
| खर्च | जिल्हा | तालुका |
| भोजन भत्ता | 25,000 | 23,000 |
| निवास भत्ता | 12,000 | 10,000 |
| निर्वाह भत्ता | 6,000 | 5,000 |
| एकूण | 43,000 | 38,000 |
अर्ज कुठे करायचा?
अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतो. त्या अर्जाची प्रत सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे सादर करावी.