तुम्ही सुद्धा फ्रेशर्स आहात आणि नुकतेच जॉबला लागला आहात का? मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता EPFO तर्फे पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15000 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ELI Scheme जाहीर केली होती. त्यानंतर 1 जुलै रोजी ELI म्हणजेच “एम्पलॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्ह योजने”ला मंजुरी देण्यात आली. ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या दरम्यान सुरू राहणार असून हा भत्ता दोन टप्प्यात दिला जाईल.
ऑगस्टनंतर जे पहिली नोकरी सुरू करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 99446 कोटी रुपयांचा निधी ईएलआय योजनेसाठी मंजूर केला आहे. 1 ऑगस्टनंतर ईपीएफओच्या पोर्टलवर ज्यांची नोंदणी होईल आणि यूएएन क्रमांक जनरेट होईल. ज्या कर्मचाऱ्यांचा UAN नंबर जनरेट होईल तेच कर्मचारी योजनेसाठी पात्र असतील. देशभरात रोजगार निर्मितीला भक्कम पाठिंबा मिळावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
15 हजार रुपये कसे मिळणार?
केंद्र सरकारनं 99446 कोटी रुपयांचा निधी ईएलआय योजनेसाठी मंजूर केला आहे. या योजनेद्वारे नोकरी देणाऱ्या संस्थांना किंवा कंपन्यांना भत्ता दिला जाणार असून तो दोन टप्प्यात दिला जाईल. पहिली नोकरी लागल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात त्याच कंपनीत कर्मचाऱ्यानं काम करणं अनिवार्य आहे. सहा महिन्यानंतर 7500 रुपये कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होतील. तर दुसरा भत्ता हा 12 महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल.