तीन हजार रुपये भरा आणि वर्षभराचा Fastag Pass मिळवा, कोणत्या वाहनांना होणार फायदा? वाचा…

केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून वार्षिक पासाची (Fastag Pass) योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पास वाहनधारकांना काढता येणार आहे.

काय आहे फास्टॅग आधारित वार्षिक पास

  1. वार्षिक पास कार, जीप, व्हॅन या खासगी वाहनांना लागू असेल.
  2. व्यावसायिक वाहनांना वार्षिक पास काढता येणार नाही.
  3. पास काढणाऱ्या वाहनांना वर्षभरात राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरुन 200 वेळा प्रवास करण्याची मुभा असेल.
  4. हा पास देशभरातली सर्व राष्ट्रीय महामार्गावंर वैध असणार आहे.
  5. पास काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
  6. राज्य सरकार किंवा इतर सरकारी प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर हा पास चालणार नाही.

Leave a comment

error: Content is protected !!