Fort Making Competition – वयगांवमध्ये शिवस्मृतींना उजाळा देणारी भव्य दिव्य किल्ला बांधणी स्पर्धा

वाई तालुक्यातील वयगांव गावामध्ये श्री गुरुदत्त कला क्रीडा मंडळाच्या वतीने “किल्ला बांधणी स्पर्धा 2025” (Fort Making Competition) चे आयोजन करण्यात आले आहे. 18 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इच्छूक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलाकृतीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची सुवर्ण संधी आहे. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा दसवडी ते कोंढवली या गावांपर्यंत मर्यादीत राहिल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अक्षय वाडकर – 7744978970 आणि संतोष सुर्यवंशी – 9527952214 यांना संपर्क साधून आपली नोंदणी करता येईल. वाट पाहू नका लगेच नोंदणी करा.